esakal | सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस - IMD
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

महाराष्ट्रातही काही भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आहे. यात कोकण, विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस - IMD

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - सप्टेंबर २०२१ मध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सरासरीपेक्षा हे ११० टक्के पाऊस होईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. १९६१-२०१० या कालावधीतील आकडेवारीच्या आधारे सप्टेंबरमध्ये पावसाची सरासरी १७० मिलीमीटर इतकी आहे.

याआधीच्या अंदाजावरून अशी माहिती मिळते की, मध्य भारतातील अनेक भागात नेहमीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व भारतातील दक्षिण भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा: Delhi Rain : धुवांधार पावसाने राजधानी तुंबली, रस्ते जलमय

भारताच्या हवामान विभागाने म्हटलं आहे की, ऑगस्ट महिन्यात दरवर्षीच्या तुलनेत २४ टक्के कमी पाऊस पडला. मात्र सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. एक जून ते ३० सप्टेंबरचा देशातील एकूण पाऊस सर्वसाधारण, मात्र सरासरीच्या खाली राहण्याची शक्यता आहे. त्यांनी म्हटलं की, सप्टेंबर महिन्यात मध्य भारतातील अनेक भागात सामान्य प्रमाणापेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातही काही भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आहे. यात कोकण, विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात मात्र पाऊस सर्वसाधारण राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा: उत्तर भारतात पावसाचं थैमान; गाझियाबादमध्ये पाच जणांचा मृत्यू

दरवर्षी पावसाळ्यातील एकूण पावसाच्या तुलनेत ९ टक्के कमी पाऊस यावर्षी आतापर्यंत पडला आहे. सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडल्यानं हे प्रमाण आणखी कमी होईळ. ऑगस्टच्या आधी जून महिन्यात सुद्धा ७ टक्के पाऊस कमी पडला होता.

देशात ऑगस्टमध्ये दरवर्षींच्या तुलनेत २४ टक्के कमी पाऊस पडला. मात्र सप्टेंबरमध्ये ही कसर भरून निघेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दिल्लीत सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी तुफान पाऊस झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी १२ वर्षांमध्ये सप्टेंबरच्या एका दिवसात सर्वाधिक अशा पावसाची नोंद दिल्लीत झाली. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासात ११२.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

loading image
go to top