2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 40 ट्रिलियन डॉलर असेल; मुकेश अंबानींचं भाकीत : Mukesh Ambani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani News

Mukesh Ambani: 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 40 ट्रिलियन डॉलर असेल; मुकेश अंबानींचं भाकीत

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत ४० ट्रिलियन डॉलर अर्थात ४० अब्ज डॉलरवर पोहोचलेली असेल असं भाकीत रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्यक्त केलं आहे.

या प्रवासात भारत आर्थिक विकास आणि भरपूर नव्या संधींचा साक्षीदार बनेल तसेच भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात बड्या तीन अर्थव्यवस्थेत समाविष्ट होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीतील पंडीत दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. (India will be a 40 trillion dollar economy by 2047: Mukesh Ambani)

हेही वाचा: Governer Koshyari Row: राज्यपाल कोश्यारींना हटवण्यासाठी कोर्टात याचिका; लवकरच होणार सुनावणी

अंबानी म्हणाले, येणाऱ्या दशांमध्ये भारत विकासाच्या तीन क्रांती घडवून आणेल, यामध्ये स्वच्छ ऊर्जा, जैव ऊर्जा आणी डिजिटल क्रांतीचा समावेश आहे.

भारताच्या भविष्यातील नेत्यांना हे ठरवावं लागेल की, देशानं स्वच्छ आणि हरित ऊर्जा क्रांतीचं नेतृत्व करावं. या मोहिमेत यश मिळवण्यासाठी तीन मंत्र आहेत ते म्हणजे थिंक बिग, थिंग ग्रीन आणि थिंक डिजिटल.

हेही वाचा- गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....