राज्यपाल कोश्यारींना हटवण्यासाठी कोर्टात याचिका; लवकरच होणार सुनावणी : Governer Koshyari Row | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagatsingh Koshyari on shivaji maharaj

Governer Koshyari Row: राज्यपाल कोश्यारींना हटवण्यासाठी कोर्टात याचिका; लवकरच होणार सुनावणी

मुंबई : महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त विधानं करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरुन हटवण्यासाठी आता कायदेशीर हालचाली सुरु झाल्या आहेत. दीपक जोगदेव यांच्यावतीनं कोर्टात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी देखील होणार आहे. साम टिव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Governor Bhagat Singh Koshyari Petition filed in court to remove him hearing to be held soon)

हेही वाचा: Shradha murder case: आफताबची पॉलिग्राफ टेस्ट सुरु; FSL लॅबमध्ये पार पडणार चाचणी

या वृत्तानुसार, राज्यपालांवर राज्यातील शांतता बिघडवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. दीपक जगदेव यांच्यावतीनं ही फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांचा अपमान केला आणि त्यामुळं शांतता बिघडवलेली आहे, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

राज्यपालांविरोधात महाभियोग चालू शकतो

भारतीय घटनेतील कलम १५६ आणि अनुच्छेद ६१ अंतर्गत राज्यपालांना पदावरुन काढण्याची प्रक्रिया दिलेली आहे. यामध्ये राज्यपाल जर एखाद्या राज्याच्या हिताची कृती करत असेल किंवा राज्याचा अपमान करत असेल तर या अनुच्छेदाखाली त्यांच्यावर विधानभवनात महाभियोग चालवता येतो आणि त्यांना या पदावरुन दूर केलं जाऊ शकतं. एकदा ते पदावरुन दूर झाल्यानंतर त्यांनी पदावर असताना जे काही कृत्य केलं असेल त्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई देखील होऊ शकते, अशी माहिती अॅड. नितीन सातपुते यांनी दिली.

राज्यपाल कोश्यारींचा दिल्ली दौरा

वादग्रस्त विधानांमुळं टीकेचे धनी ठरलेले राज्यपाल भगसिंह कोश्यारी येत्या २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. वादग्रस्त विधानानंतर कोश्यारींचा दिल्ली दौरा होत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीत बसलेले पक्षश्रेष्ठी कोश्यारींची कानउघडणी करणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.