भारताजवळ 2021 च्या सुरुवातीला असणार कोविड-19 लस; किंमतही ठरली 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 28 August 2020

कोरोना विषाणू महामारीविरोधात लढणाऱ्या भारतामध्ये (Coronavirus Vaccine In India) 2021 च्या पहिल्या तीन महिन्यात खात्रीलायकरित्या कोरोनावरील लस असेल.

न्यूयॉर्क- कोरोना विषाणू महामारीविरोधात लढणाऱ्या भारतामध्ये (Coronavirus Vaccine In India) 2021 च्या पहिल्या तीन महिन्यात खात्रीलायकरित्या कोरोनावरील लस असेल. तसेच पुणे स्थित सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आपली पहिली कोरोनावरील लस वितरित करण्याच्या स्थितीत असेल, अशी माहिती वॉल स्ट्रिट रिसर्च आणि ब्रोकरेज फर्म, बर्नस्टीन रिसर्चने गुरुवारी आपल्या एका अहवालात दिली आहे. 

"जो बायडेन यांचा विजय झाल्यास चीन अमेरिका ताब्यात घेईल"

बर्नस्टीनच्या अहवालानुसार, चार जागतिक उमेदवार असे आहेत जे 2020 वर्षाच्या शेवटी किंवा 2021 त्या सुरुवातीपर्यंत कोविड-19 लस निर्माण करतील. ऑक्सफर्ड युनिवर्सिटीची वेक्टर लस आणि नोवावैक्सची लस या दोन लशींसोबत सीरम इन्स्टीट्यूट ने भागीदारी केली आहे. त्यामुळे सीरम इन्स्टीट्यूट  लवकरच मोठ्या प्रमाणात लस निर्मितीचे काम हातात घेऊ शकते.

या दोन्ही उमेदवारांनी घेतलेल्या परिक्षणात, लस सुरक्षित असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही लशींकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अहवालानुसार, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया 2021 मध्ये 60 करोड डोस आणि वर्ष 2020 मध्ये 100 करोड डोस निर्माण करण्याची क्षमता ठेवते. सरकारसाठी प्रति डोस तीन डॉलरला मिळणार आहे, तर उपभोक्त्यांना प्रति डोससाठी 6 डॉलर मोजावे लागण्याची शक्यता आहे. 

भारतातील तीन कंपन्या लशीचे उत्पादन करु शकणार आहेत. सीरम इन्स्टीट्यूट, भारत बायोटेक आणि अन्य छोट्या कंपन्या मिळून भारत वर्षभरात 230 कोटी डोस तयार करु शकतो. जागतिक स्तरावर एकटी सीरम इन्स्टीट्यूट 150 कोटी डोस निर्माण करण्याची क्षमता ठेवते, असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील भारत आणि कमी ते मध्यम उत्पन्न गटातील देशांसाठी 10 कोटी डोस निर्माण करणार असल्याचं जाहीर केलं होतं. शिवाय सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादन वाढवण्यासाठी गावी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशसोबत भागीदारी केली होती. 

आंतराष्ट्रीय बाजारात सोने उतरले; भारतातील दरही कमी होणार

2021 च्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात लशीचे उत्पादन

सीरम इन्स्टिट्यूटने केलेल्या भागीदारीमुळे मोठ्या प्रमाणात लस निर्माण करण्यास मदत मिळणार आहे. जेव्हा ऑक्सफर्ड युनिवर्सिटीची वेक्टर लस आणि नोवावैक्सची लस या दोन्हींना नियामक मान्यता आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून अनुमती मिळाल्यास भारत आणि कमी ते मध्यम उत्पन्न गटातीस देशांमध्ये 2021 च्या पहिल्या सहा महिन्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि वितरण शक्य आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India will have covid vaccine in early 2021 said in report