'आत्मनिर्भर भारत'ला बूस्ट; वायुसेना देशातच बनवणार 96 लढाऊ विमाने| Fighters Jets | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fighter Jet Aircraft

'आत्मनिर्भर भारत'ला बूस्ट; वायुसेना देशातच बनवणार 96 लढाऊ विमाने

नवी दिल्ली : वायु सेना लवकरच भारतीय बनावटीचे लढाऊ विमाने बनवणार आहे. पंतप्रधान मोदींनी आणलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवला जात असून दीड लाख कोटी रुपयांच्या निधीमध्ये भारत तब्बल 114 लढाऊ विमाने बनवणार आहे. त्यापैकी 96 लढाऊ विमाने भारतात बनवले जाणार आहेत. दरम्यान उरलेले 14 विमाने परदेशातून आयात केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

(India Will Make 114 Fighters Jets In 1.5 Lakh Crore)

"विदेशातून खरेदी करा आणि भारतात बनवा" या संकल्पनेतून भारतीय वायू सेनेने हा प्रकल्प राबवला आहे. त्यामध्ये भारतीय कंपन्या परदेशी विक्रेत्यासोबत करार करता येणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतीय वायू सेनेने विदेशी ग्राहकांसोबत करार केला असून भारतात प्रकल्प राबवण्याबाबत त्यांनी चर्चा केली असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: Muhammad Paigambar Row: वादग्रस्त पोस्टप्रकरणी बंगालमधून भाजप नेत्याला अटक

या योजनेनुसार 18 विमानांची आयात केली जाणार असून 36 विमाने देशांत बनवले जाणार आहेत. आणि दोन्ही देशांच्या चलनाद्वारे हा व्यवहार होणार असल्याचं सांगितलं आहे. आणि उर्वरित 60 विमाने ही भारतीय भागीदारीची मुख्य जबाबदारी असेल असं सांगितलं आहे. या 60 विमानाचे व्यवहार हे भारतीय चलनात होणार असल्याच सांगण्यात आलं आहे.

भारतीय चलनात पेमेंट केल्याने विक्रेत्यांना 'मेक-इन-इंडिया' प्रकल्पातील 60 टक्क्यांहून अधिक सामग्री प्राप्त करण्यास मदत होईल, असं सूत्रांनी सांगितलं. बोईंग, लॉकहीड मार्टिन, साब, मिग, इर्कुट कॉर्पोरेशन आणि डसॉल्ट एव्हिएशनसह जागतिक विमान निर्माते या निविदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: India Will Make 114 Fighters Jets In 15 Lakh Crore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra ModiIndia
go to top