
नवी दिल्ली : कोणत्याही स्थितीत भारत दहशतवाद सहन करणार नाही आणि तसे धोरण असून आमच्या सहकाऱ्यांनी ते समजून घ्यावे, अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज भारत दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान संवाद साधताना व्यक्त केली.