
नवी दिल्ली- तेलाचे वाढणारे भाव आणि पुरवढ्याच्या अनिश्चिततेपासून वाचण्यासाठी भारताने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सध्या तीन मोठे राखीव तेल भांडार आहेत. पहिल्यांदाच भारताने परदेशात आणीबाणीसाठी राखीव तेल भांडार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत आता आपले काही तेल अमेरिकेमध्ये साठवेल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी याची घोषणा केली. दोन्ही देशांमध्ये सामरिक पेट्रोलियम साठ्यासंबंधी करार झाला आहे. या तेलाच्या भांडाराची किती क्षमता असेल याची माहिती दिली गेली नाही. मात्र, भारत मोठ्या क्षमतेचे भांडार करण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेमधील संरक्षण क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत होतील, असं मानलं जात आहे.
भारतातील मोठ्या शहरांची कोरोनाची स्थिती काय? जाणून घ्या!
तेलाचे भांडार बाहेरुन मोठ-मोठ्या बॅलरसारखे दिसतात. जमीनीच्या आतमध्ये सुरुंगांचं जाळं पसरलेलं असतं, यात तेल साठवलं जातं. आणीबाणीच्या परिस्थितीत असं आतमध्ये साठवलेलं तेल सुरक्षित मानलं जातं. हे तेल जमीनीपासून दोन ते चार हजार फुटांपर्यंत असू शकतं. यातून तेल काडण्यासाठी खालून पाणी भरलं जातं, जेणेकरुन तेल आपोआप वरती येतं.
अमेरिकेमध्ये तेल साठवण्यासंबंधी भारताकडे दोन पर्याय आहेत. जेव्हा तेलाचे दर कमी असतील तेव्हा काही भांडार भाडेतत्तावर घेणे किंवा अगोदर भांडार भाडेतत्तावर घेणे आणि त्यानंतर तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतर त्यातून फायदा कमावणे. सरकारी कंपनी इंडियन ऑईलचा अमेरिकेसोबत करार झाला आहे. त्यामुळे ही कंपनी तेल खरेदी करु शकते. मात्र, किती तेल खरेदी केले जाईल याची माहिती दिली गेली नाही.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु होण्यापूर्वी भारत दिवसभरात साडे चाळीस लाख बॅरेल तेल खर्च करत होता. भारताकडे सध्या 3.8 कोटी बॅरेलचा साठा आहे, जो 9 ते 10 दिवसापर्यंत पुरतो. जगात सर्वाधिक तेल साठा अमेरिकेकडे आहे. अमेरिकेकडे 71.4 कोटी बॅरेल तेल साठवण क्षमता आहे.
भारत जगातील तिसरा सर्वाधिक तेलाचा वापरकर्ता देश आहे. तेलाच्या चढ-उताराचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पडत असतो. पेट्रोलियम साठे हे संकटाच्यावेळी वापरण्यासाठी असतात. नैसर्गिक आपत्ती, युद्ध किंवा इतर संकटात तेलाचा पुरवढा खंडीत झाल्यास याचा वापर होते. भारतात तीन राखीव तेल भांडार असून विशाखापट्टनम (आंध्रप्रदेश), मंगलोर (कर्नाटक) आणि पाडूर (कर्नाटक) येथे ते स्थित आहेत. याशिवाय भारताने चंगीखोल (ओडिशा) आणि पादूर (कर्नाटक) येथे दोन राखीव तेल भांडार करण्याचे घोषीत केले आहे. यांच्या निर्मितीनंतर भारताकडे 22 दिवसांचा राखीव तेल साठा असेल.
गलवान खोऱ्यात जे घडलं ते चीनने ठरवूनच केलं; US अहवालातून शेजाऱ्याचा खोटारडेपणा...
दरम्यान, 1990 मध्ये आखाती युद्धादरम्यान तेल संकट निर्माण झाले होते. त्यावेळी आपल्याकडे केवळ तीन दिवसांचा तेल साठा होता. त्यानंतर भारताने राखीव तेल भांडार निर्मितीचे काम मनावर घेतले. तीन राखीव तेल भांडार बनवण्यासाठी भारताने 4,100 कोटी रुपये खर्च केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.