पाकिस्तानचे ड्रोन पाडले

वृत्तसंस्था
सोमवार, 4 मार्च 2019

बिकानेर  (वृत्तसंस्था)  : भारताच्या हद्दीत घुसलेले एक ड्रोन भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 एमकेआय विमानाने आज पाडले. जम्मू-काश्‍मीरपाठोपाठ पाकिस्तानने राजस्थानच्या सीमेवर कुरापती सुरू केल्या आहेत.

पाकिस्तानचे एक ड्रोन आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भारताच्या नाल विभागात घुसले. त्यानंतर लगेचच ते पाडण्यात आले. त्याचे अवशेष अब्बास किल्ल्याच्या परिसरात पडल्याचे सूत्रांनी सांगितले. सीमा सुरक्षा दलानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच याचे अवशेष भारताच्या हद्दीत पडले नसल्याचेही स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian air force down Pakistani drone