First Air Marshal Couple : इंडीयन एअर फोर्सला मिळालं पहिलं एअर मार्शल जोडपं, तीन पिढ्यांनी केलीय देशाची सेवा

एअर मार्शल साधना सक्सेना आणि एअर मार्शल केपी नायर यांनी इतिहास रचला आहे
First Air Marshal Couple
First Air Marshal Coupleesakal

First Air Marshal Couple : लष्करी सेवेतील लैंगिक विषमता दूर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता महिला अधिकारीही लढाऊ विमाने उडवत आहेत.एअर मार्शल साधना सक्सेना आणि एअर मार्शल केपी नायर यांनी इतिहास रचला आहे. ते भारतीय हवाई दलाचे पहिले एअर मार्शल जोडपे ठरले आहेत. आतापर्यंत तुम्ही आयएएस पती-पत्नी आणि डॉक्टर जोडप्याबद्दल ऐकले असेल, परंतु पती-पत्नीने एअर मार्शल होण्याचा पराक्रम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या साधना सक्सेना यांनी सोमवारी सशस्त्र सेना रुग्णालय सेवेच्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.त्यांचे पती फायटर पायलट आणि एअर मार्शल केपी नायर 2015 मध्ये भारतीय हवाई दलाच्या महासंचालक पदावरून निवृत्त झाले. अशाप्रकारे या दोघांनी एअर मार्शल पदापर्यंत पोहोचून इतिहास रचला आणि देशातील असे पहिले जोडपे ठरले.

First Air Marshal Couple
Health Care News: भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; आजच फॉलो करा या टिप्स

तीन पिढ्यांनी सेवा केली

हवाई दलात सेवा करणाऱ्या साधना त्यांच्या कुटुंबातील एकमेव व्यक्ती नाहीत. त्यांच्या गेल्या तीन पिढ्या लष्करी सेवेत आहेत. भारतीय हवाई दलाच्या नोंदीनुसार, एअर मार्शल साधना नायर यांच्या कुटुंबातील तीन पिढ्या लष्करात सेवा देत आहेत. साधना सक्सेना यांचे वडील आणि भाऊ लष्करात डॉक्टर आहेत. आणि आता तिसरी पिढी म्हणून त्यांचा मुलगा भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून कार्यरत आहे. अशा प्रकारे त्यांचे कुटुंब भारतीय हवाई दलात गेल्या 7 दशकांपासून सेवा करत आहे.

First Air Marshal Couple
Health Care: प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरला जबाबदार आहेत हे पदार्थ, जाणून घ्या

एअर मार्शल साधना नायर या एअर मार्शल पदावर बढती मिळालेल्या हवाई दलातील दुसऱ्या महिला आहेत. याआधी साधना नायर बंगळुरू येथील भारतीय वायुसेना प्रशिक्षण कमांडमध्ये प्रधान वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. देशाच्या पहिल्या महिला एअर मार्शल होण्याचा विक्रम पद्मा बंदोपाध्याय (निवृत्त) यांच्या नावावर आहे.

First Air Marshal Couple
Dental Health Tips : आता स्माईल करा मोठी; या घरगुती उपायांनी करा दातांवरील किडीची सुट्टी

पुण्यातून डॉक्टरकी, स्वित्झर्लंडहून मिलिटरी मेडिसिनचे शिक्षण

एअर मार्शल साधना नायर यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथून पदवी प्राप्त केली आहे. यानंतर त्यांनी फॅमिली मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. डिसेंबर 1995 मध्ये त्या भारतीय हवाई दलात दाखल झाल्या. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, त्यांनी एम्स नवी दिल्ली येथे मेडिकल इन्फॉर्मेटिक्समध्ये 2 वर्षांचा प्रशिक्षण कार्यक्रम केला.

First Air Marshal Couple
Health Tips :  पोटात गॅस झाला की कळायचंच बंद होतं, लगेचच करा हे उपाय,फरक पडेल

याशिवाय स्वित्झर्लंडमधून सीबीआरएन (केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल, न्यूक्लियर) वॉरफेअर आणि मिलिटरी मेडिकल एथिक्सचा कोर्स केला.त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया यूजर्स लिहितात, भारतीय हवाई दलात इतिहास रचणाऱ्या या जोडप्याला सलाम.

First Air Marshal Couple
Health Care News : चहा-कॉफीमध्ये साखर टाळण्यासाठी 'या' गोष्टींचा करा वापर

महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुरुवातीपासून सशस्त्र दलात कायमस्वरूपी कमिशन मिळत आले आहे, परंतु इतर विभागांमध्ये परिस्थिती वेगळी होती. ही लैंगिक विषमता दूर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. यानंतर आता महिला अधिकारीही लढाऊ विमाने उडवत आहेत. युद्धनौकांवर काम करणे, तोफखाना रेजिमेंटमध्ये हॉवित्झर आणि रॉकेट सिस्टीमचे नेतृत्व करण्याचे काम देखील महिला करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com