
हरियाणातील पंचकुला येथे भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या अपघातात पायलट थोडक्यात बचावला. हवाई दलाच्या निवेदनानुसार, लढाऊ विमानाने अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. पंचकुलाच्या डोंगराळ भागात असलेल्या मोरनी येथील बलदवाला गावाजवळ हे लढाऊ विमान कोसळले. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले.