esakal | भारताच्या हवाई दलाची ताकद वाढणार; एअरबस आणि टाटासोबत २२ हजार कोटींचा करार
sakal

बोलून बातमी शोधा

C-295

भारताच्या हवाई दलाची ताकद वाढणार; एअरबस आणि टाटासोबत २२ हजार कोटींचा करार

sakal_logo
By
सुधीर काकडे

भारतील हवाई दलाने मेक इंडिया अंतर्गत टाटा समुहासोबत एक मोठा करार केला आहे. हवाई दलासाठी नवीन विमानं तयार करण्याच्या या करारावर शुक्रवारी स्वाक्षरी करण्यात आली आहे. एकूण २०,००० करोड रुपयांचा सी-२९५ विमान तयार करण्याचा करार हवाई दलाच्या इतिहासातील एक मोठा करार आहे. टाटा कंपनी ही हवाई दलाचे विमानं तयार करणारी पहिली खासगी कंपनी असणार आहे. सुरुवातील हैदराबाद किंवा बंगळुरु मध्ये ही विमानं तयार करण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात होतं मात्र आता उत्तर प्रदेशमध्ये आणि गुजरातमध्ये हा प्रकल्प सुरु होणार असल्याचं समजतं आहे.

टाटा समूह एअर बस डिफेन्स एँड स्पेस या स्पेनच्या कंपनीसोबत मिळून हवाई दलाच्या सी-२९५ विमानांची निर्मीती करणार आहे. सी-२९५ हे विमान हवाई दलाच्या सैनिकांच्या वाहतुकीसाठी वापरली जातात. केंद्र सरकारने या प्रकल्पाचा करार टाटा समुहाला दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा करार प्रलंबित होता. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा २०,००० करोड रुपयांचा करार असणार आहे.

हेही वाचा: ‘पेगॅसस’प्रकरणी चौकशी होणार : सर्वोच्च न्यायालय

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ए भारतभूषण बाबू यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. भारताचे संरक्षण मंत्रालय आणि एअरबस डिफेन्स एँड स्पेस या स्पेन स्थित कंपनीला ५६ सी-२९५ ही विमानं तयार करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती, ए भारतभूषण बाबू यांनी यावेळी दिली आहे. यातील 16 विमाने 48 महिन्यांच्या आत स्पेनमधून उड्डाणासाठी तयार स्थितीत दिली जातील, तर 10 वर्षांच्या आत टाटा कन्सोर्टियमद्वारे 40 विमाने भारतात तयार केली जातील.

हवाई दलाकडे 1960 च्या दशकातील ५ एव्ह्रो ट्रान्स्पोर्ट विमाने आहेत, जी सध्या तात्काळ बदलण्याची गरज आहे. मे २०१३ मध्ये जागतिक कंपन्यांना रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) देण्यात आला होता. त्यानंतर सी -२९५ विमानांच्या निर्मीतीसाठी एअरबस आणि टाटा समूहासोबत संरक्षण मंत्रालयाने करार केला आहे.

loading image
go to top