Aero India Show: भारतीय हवाई दलाची भरारी, आकाशात 'आत्मनिर्भर' संरक्षणाची झलक, पाहा व्हिडिओ

aero show.jpg
aero show.jpg

बंगळुरु- एअरो इंडिया-2021 मध्ये भारतीय लष्कराने आकाशात आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत लढाऊ विमानांनी हवेत भरारी घेतली. सुखोई Su-30MKI या लढाऊ विमानांनी हवेत त्रिशूल बनवले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.  चित्तथरारक हवाई कवायतींनी  बंगळूर शहर रोमांचित झाले.​ तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन एअरो इंडिया-2021 ला शुभेच्छा दिल्या.  दरम्यान, बंगळूरच्या येलहंका हवाई दलाच्या स्थानकावर 13 व्या एरो इंडिया-2021 चे आयोजन होत आहे.

तर राजनाथ सिंह यांनी देशाचे सुरक्षा तंत्र मजबूत करण्यासाठी पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले. आम्ही पुढील 7-8 वर्षांत सैन्यदलाच्या आधुनिकीकरणावर 130 बिलियन डॉलर खर्च करण्याची योजना तयार असल्याचेही ते म्हणाले. 

बंगळुरु येथे होत असलेला एअरो इंडिया शो अनेक कारणांमुळे खास आहे. यापूर्वी विदेशातील लोक आपले तंत्रज्ञान घेऊन या प्रदर्शनात सहभागी होत आणि येथील कंपन्यांशी हातमिळवणी करुन ते तंत्रज्ञान मिळवत असत. यावेळी भारत स्वतः शोकेस करत आहे. यावेळी एचएएलने निर्मित केलेला लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर कसरती दाखवत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये जेथून धूर निघतो, त्याला स्टफ विंग्स म्हणतात. यामध्ये हार्ड पॉँईंट्स असतात. त्यात शस्त्रास्त्रे लोड केले जातात. रॉकेट किंवा मिसाइल तेथे लोड होतात.

आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाला बुस्ट देण्यासाठी एरो इंडिया शो महत्त्वाचा ठरणार आहे. कोविडमुळे प्रदर्शन पाहणाऱ्या श्रोत्यांच्या संख्येवर मर्यादा आणली असून दररोज केवळ ३ हजार नागरिकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे.आत्मनिर्भर फॉर्मेशन फ्लाइटमध्ये स्वदेशी लढाऊ विमान तेजसबरोबर फिक्सड विंग आणि रोटरी विंग एअरक्राफ्टने उड्डाण केले. एचएएल निर्मित अडव्हान्स्ड हॉक एमके-132, सिव्हिल डोर्निअर-228, एलसीए ट्रेनर, एचटीटी-40 आयजेटी, एअरक्राफ्टने उड्डाण करतील. ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाइलचेही एअरो इंडियात प्रदर्शन करण्यात आले. भारतीय नौदलाची पुढील पिढी समुद्र किनाऱ्याच्या रक्षकाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज आहे. 

लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट मार्क- 1 ए हे एचएएलने डिझायन आणि डेव्हलप केले आहे. हे आधुनिक आणि फोर्थ जनरेशनचा फायटर एअरक्राफ्ट आहे. यामध्ये एक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड अरे रडार, बियाँड व्हिजुएल रेंज मिसाइल, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट आणि एअर टू एअर रिफ्यूलिंग प्लॅटफॉर्मही आहे, ज्यामुळे ऑपरेशनल गरजा पूर्ण करतील. 

3 ते 5 फेब्रुवारीपर्यंत एअरो इंडिया शो
3 फेब्रुवारीपासून सुरु झालेला एअरो इंडिया शो 5 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. एअरो इंडिया शो दोन वर्षांत एकदा होतो. आशियातील हा सर्वांत मोठा एअर शो आहे. या शो मध्ये एव्हिएशन सेक्टरमधील मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीपासून भारताच्या एअरफोर्सपर्यंत जगातील अनेक देश सहभागी होत असतात. 

यावेळी विदेशी एक्जिबिटर्सची संख्या कमी
2019 मध्ये एअरो इंडियामध्ये एकूण 403 एक्जिबिटरपैकी 165 विदेशी एक्जिबिटर सहभागी झाले होते. तर यंदा एकूण 600 एक्जिबिटर आहेत. त्यात 78 विदेशी एक्जिबिटर आहेत. एअरो इंडियामध्ये इंडियन ओशन रिजन कॉन्क्लेवचेही आयोजन केले जाणार आहे. कॉन्क्लेवसाठी 28 देशांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. यापैकी 18 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. तर 8 देशांचे प्रतिनिधी व्हर्च्युअली जोडले जातील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com