

Indian Air Force Modernisation Gets Major Push With 210 Aircraft And 115000 Crore Plan For Local Manufacturing
sakal
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या ताफ्याला अधिक धारदार आणि मजबूत करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. हवाई दलासाठी ६० बहुउद्देशीय वाहतूक विमाने आणि १५० प्रशिक्षणार्थी विमाने खरेदी करण्याच्या उद्देशाने माहिती मागविणारे पत्र संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे. अंदाजे एक लाख १५ हजार कोटी रुपयाच्या या प्रकल्पांमुळे भारतातील लष्करी विमाननिर्मिती क्षेत्रात एक नवी क्रांती घडणार आहे.