भारतीय लष्कराचा दहशतवाद्यांवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक 

वृत्तसंस्था
शनिवार, 16 मार्च 2019

म्यानमारमधील "अराकन आर्मी' या दहशतवादी संघटनेने मिझोराम सीमेवर बस्तान बसविले आहे. त्यांच्याकडून कलादान प्रकल्पला धोका आहे. "अराकन आर्मी'ला काचिन इंडिपेंडन्स आर्मीकडून प्रशिक्षण दिलेले असून उत्तरेकडील चीन सीमेपर्यंत प्रशिक्षण केंद्रे आहेत. अरुणाचल प्रदेशच्या जवळील प्रदेशातून मिझोरामच्या सीमेपर्यंत एक हजार कि.मी.पर्यंत प्रवास केला असल्याचे सांगण्यात आले. 

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये हवाई हल्ले करून भारताने दशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केल्यानंतर काही दिवस भारतासह जगाचे लक्ष त्यावर केंद्रित झाले होते. याच दरम्यान लष्कराने म्यानमार सीमेवरील कार्यरत दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट केली. 

म्यानमारच्या सैन्याच्या मदतीने लष्कराने ही कारवाई 17 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात केली. यात डझनभर दहशतवादी अड्डे उद्‌ध्वस्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ईशान्येकडील राज्यांसाठी महत्त्वाचा असलेला कलादान हा बहुउपयोगी प्रकल्प आहे. याद्वारे म्यानमारमधील सितवे बंदराद्वारे मिझोराम व कोलकाता जोडले जाणार आहे. मात्र, हा प्रकल्प म्यानमारमधील दहशतवाद्यांच्या "हिटलिस्ट'वर आहे, त्यावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यासाठी आणि त्यांना जरब बसविण्यासाठी लष्कराने हा हल्ला केला. 

म्यानमारमधील "अराकन आर्मी' या दहशतवादी संघटनेने मिझोराम सीमेवर बस्तान बसविले आहे. त्यांच्याकडून कलादान प्रकल्पला धोका आहे. "अराकन आर्मी'ला काचिन इंडिपेंडन्स आर्मीकडून प्रशिक्षण दिलेले असून उत्तरेकडील चीन सीमेपर्यंत प्रशिक्षण केंद्रे आहेत. अरुणाचल प्रदेशच्या जवळील प्रदेशातून मिझोरामच्या सीमेपर्यंत एक हजार कि.मी.पर्यंत प्रवास केला असल्याचे सांगण्यात आले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात मिझोरामच्या सीमेवर नव्याने उभारलेले दहशतवादी अड्डे उद्‌ध्वस्त करण्याठी मोठ्या प्रमाणावर संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली होती. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात टागा भागातील "नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड'च्या (एनएससीएन- के) मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले आणि अनेक दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आले. रोंहिग्या, अराकान आर्मी आणि "एनएससीएन- के' यांच्याविरोधातील भारत- म्यानमारमधील ही संयुक्त मोहीम दोन आठवडे चालली. तिचे नियोजन दोन महिन्यांपूर्वीच झाले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Army carried out mega operation against terrorist in Myanmar