
Army Day 2023 : जीवाचं रान करून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांचे अंगावर काटा आणणारे Video
आज लष्कर दिन. आपल्या जीवाचं रान करून देशाचं आणि सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी आजचा महत्त्वाचा दिवस. त्यांच्या कार्याचा सन्मान करावा तितका कमी असतो. ज्या जवानांमुळे आपल्या देशाच्या सीमा आज सुरक्षित आहेत. त्या जवानांना कोणत्या परिस्थितीत जगावं लागतं आपल्याला माहितीये?
हेही वाचा - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....
हिवाळा असो की पावसाळा जवानांना आपल्या सीमेवर रहावं लागतं. उत्तर भारतात तर शून्य डिग्रीपेक्षाही कमी तापमानात त्यांना सतर्क रहावं लागतं. अनेकजणांना सीमेचं रक्षण करता करता वीरमरण येते. जवानांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
आत्तापर्यंत आपण जवानांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील पण हे व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. जवानांना कंबरेएवढ्या बर्फातून वाट काढून जावं लागतं तर हिमवादळामध्ये झोपावं लागतं. जवानांची ही स्थिती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
बर्फाळ प्रदेशात हॉलीबॉल खेळणाऱ्या जवानांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्याचबरोबर भारत चीन सैन्यांमधील झटापटीचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यामध्ये भारतीय सैनिकांनी त्यांना काठीने मारून पळून लावलं होतं.
दरम्यान, सैन्यांच्या या कार्यामुळे आपण सुरक्षित आहोत. सैन्यांच्या तिन्ही दलाकडून सीमा सुरक्षेसाठी कार्य केले जाते. तर त्यांच्याप्रती देशातील प्रत्येकाला अभिमान असतो. सीमेवरील लढाईमध्ये वीरमरण आलेल्या भारतीय सैनिकांना लष्कर दिनानिमित्त विनम्र अभिवादन.