धावपट्टी नाही, विमानतळ नाही; थेट महामार्गावर उतरली ४ विमाने! भारतीय लष्कराचा थरारक प्रयोग, गडकरींनी शेअर केला VIDEO

Indian Army Aircraft Landing on Highway: गुजरातमध्ये अमृतसर-जामनगर महामार्गावर भारतीय लष्कराच्या चार विमानांचे यशस्वी लँडिंग आणि टेकऑफ, लष्कर व NHAI च्या समन्वयातून ऐतिहासिक प्रयोग.
Four Indian Army microlight aircraft from Team Mountain Eagles successfully landing and taking off from the Amritsar-Jamnagar Economic Corridor (NH-754A) in Gujarat during the Wings of Valour and Unity Expedition

esakal

Updated on: 

भारतीय लष्कर आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) समन्वयातून एक ऐतिहासिक कामगिरी पार पडली आहे. गुजरातमधील अमृतसर-जामनगर आर्थिक कॉरिडॉरवरील (NH-754A) महामार्गावर भारतीय लष्कराच्या चार मायक्रोलाइट विमानांनी यशस्वी लँडिंग केले. त्यानंतर या विमानांनी याच महामार्गावरून पुन्हा उड्डाणही केले. भारतीय लष्कराच्या ‘टीम माउंटन ईगल्स’ने ‘विंग्स ऑफ व्हॅलर अँड युनिटी एक्स्पिडिशन’मध्ये सहभागी होत ही कामगिरी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...