पँगाँग त्सो जवळ महत्त्वाच्या शिखरांवर भारताचा ताबा; ‘फिंगर-४’ माऱ्याच्या टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

भारतीय जवानांनी व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या पँगाँग त्सो सरोवराच्या उत्तरेकडील महत्त्वाच्या शिखरांवर ताबा मिळविला आहे. या शिखरांवरून फिंगर ४ वरील चिनी सैन्यावर नजर ठेवता येणे शक्य आहे.

नवी दिल्ली - भारतीय जवानांनी व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या पँगाँग त्सो सरोवराच्या उत्तरेकडील महत्त्वाच्या शिखरांवर ताबा मिळविला आहे. या शिखरांवरून फिंगर ४ वरील चिनी सैन्यावर नजर ठेवता येणे शक्य आहे. या मोहिमेमुळे सरोवराच्या दोन्ही बाजूंना भारतीय जवान मोक्याच्या जागी आले असून भारताची बाजू वरचढ झाली आहे.

पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील शिखरे ताब्यात घेण्याची कारवाई सुरु असतानाच ऑगस्टअखेरीस सरोवराच्या उत्तरेकडील ही मोहिमही राबविण्यात आली, असे ‘एएनआय’ने म्हटले आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवरानजीक चिनी सैन्याने केलेल्या घुसखोरीनंतर भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक मार्गाने चर्चा सुरू असतानाच सीमेवरही डावपेच सुरू आहेत. यामध्ये भारतीय जवानांनी अत्यंत गोपनीय मोहीम राबवीत सरोवराच्या दक्षिण भागाचा ताबा मिळवितानाच उत्तर भागात असलेल्या मोक्याच्या पर्वतशिखरांवरही ताबा मिळविला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian Army occupied heights overlooking Finger 4 along Pangong Tso lake