
India Pakistan war Viral Video: भारतीय सेनेने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या नापाक कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुरुवारी (८-९ मे २०२५) रात्री पाकिस्तानने जम्मू-कश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातच्या सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन, क्षेपणास्त्र आणि शस्त्रांद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेच्या सतर्कतेमुळे हे सर्व हल्ले अयशस्वी ठरले.