पाकिस्तानची धूळधाण उडवणाऱ्या सॅम मानेकशॉ यांच्याविषयीचे खास किस्से माहितीयत?

Marshal Sam Manekshaw
Marshal Sam Manekshawesakal
Summary

इंदिरा गांधींना 'स्वीटी' म्हणण्याची क्षमता माणेकशॉ यांच्यात होती.

पिळदार मिशावाल्या फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ (Sam Manekshaw) यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, जे प्रत्येक बाबतीत प्रत्येकाला चोख प्रत्युत्तर देत असतं. त्यांना जवळून ओळखणारा एक माणूस सांगतो, की सॅम मानेकशॉ हे पक्के लष्करी अधिकारी होते. फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ भारतीय सैन्याचे (Indian Army) सरसेनापती होते. मानेकशॉ भारताचे आठवे सैन्यप्रमुख होते.

सॅम मानेकशॉ नेहमी म्हणतात, जर एखादा सैनिक म्हणत असेल की त्याला मृत्यूची भीती वाटत नाही, तर एकतर तो खोटा बोलत असतो किंवा तो गुरखा असतो. चला मग आता पाहूया सॅम माणेकशॉ यांच्याविषयीचे काही मजेदार किस्से...

1) जेव्हा १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध (India-Pakistan War) सुरू होणार होते, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जनरल मानेकशॉ यांना विचारलं की, लढाईची तयारी पूर्ण झाली आहे का? यावर मानेकशॉ मोठ्याने म्हणाले होते की - "मी नेहमीच तयार असतो स्वीटी." यावरुन असं लक्षात येतं की, इंदिरा गांधींना (Indira Gandhi) 'स्वीटी' म्हणण्याची क्षमता माणेकशॉ यांच्यात होती.

2) १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या मध्यभागी, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मनात असे होते की, माणेकशॉ लष्कराच्या मदतीने सत्तापालट करण्याचा प्रयत्न करणार होते. यावर मानेकशॉ थेट इंदिरा गांधींकडे गेले आणि म्हणाले, तुमच्या जागेवर येण्याची पात्रता माझ्यात नाही असं तुम्हाला वाटत नाही का? नाक नाव लांब आहे, माझेही लांब आहे. मी दुसऱ्याचा कामात नाक घुसवत नाही.

marshal sam manekshaw
marshal sam manekshaw

3) एकदा लढाई सुरू असताना रणांगणावर जनरल मानेकशॉ यांना सात गोळ्या लागल्या होत्या. उपचारासाठी त्यांना लष्करी रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना विचारले काय झाले? माणेकशॉ म्हणाले, "काही नाही झालं, मला एका गाढवाने फक्त लाथ मारली. बाकी मी ठीक आहे, मला ऐवढच आठवतं आहे." त्यांचं हे उत्तर ऐकून डॉक्टर देखील थक्क झाले.

4) १९६२ मध्ये जेव्हा मिझोरामच्या (Mizoram) एका बटालियनने भारत-चीन युद्धापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मानेकशॉ यांनी त्या बटालियनला एक पार्सल पाठवलं होतं. त्या पार्सलमध्ये एक बांगड्यांचा बॉक्स आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं की, जर तुम्ही लढाईतून माघार घेत असाल तर तुमच्या बटालियन मधील सैनिकांना या बांगड्या हातात घालायला सांगा. त्यानंतर लगेच त्या बटालियननं लढाईत भाग घेतला आणि खूप चांगलं काम केलं. नंतर परत मानेकशॉ यांनीत्या बटालियनला पुन्हा एक चिठ्ठी लिहून पाठवली. चिठ्ठीत लिहलेलं होतं, आता तुम्ही तुमचं काम योग्य करता आहात. त्यामुळे तो बांगड्यांचा बॉक्स परत पाठवून द्या.

marshal sam manekshaw
marshal sam manekshaw
Marshal Sam Manekshaw
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू यांच्या गावात वीजच नाही; चिदंबरम यांचा केंद्रावर निशाणा

5) १९७१ च्या युद्धानंतर जर तुम्ही फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेले असते तर काय झाले असते, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर माणेकशॉ हजरजबाबीपणे म्हणाले, "काही नसतं झालं. फक्त १९७१ ची लढाई भारताऐवजी पाकिस्ताने जिंकली असती."

6) फील्ड मार्शल मानेकशॉ यांच्याविषयी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी १९३४ ते २००८ पर्यंत भारतीय लष्करात काम केलं. सॅम मानेकशाॅ यांना १९४२ साली मिलेट्री क्रॉस पुरस्कार, १९६८ साली पद्मभूषण आणि १९७२ साली पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या काळात त्यांनी दुसरे महायुद्ध, १९६२ चे भारत-चीन युद्ध, १९६५ चे भारत-पाकिस्तान आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भाग घेतला. भारत-चीन युद्ध आणि त्यानंतरच्या सर्व लढाया मानेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या.

7) वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात (Military Hospital) २७ जून २००८ साली न्यूमोनियाच्या उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. फील्ड मार्शल माणेकशॉ यांच्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर 'लाईफ लिव्हड सच' नावाची डॉक्युमेंट्री फिल्म नक्की बघा. फील्ड मार्शल मानेकशॉ यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची अचूक नोंद या फिल्ममध्ये आहे. या फिल्ममध्ये त्यांचे कुटुंब, त्यांच्या लष्करी सेवेबद्दलही बोलले गेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com