
Indian Astronaut Subhanshu Shukla Meets PM Modi: भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी शुभांशु शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना एक खास वस्तू भेट दिली. ज्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. ही भेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी झाली. भेटीदरम्यान शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून काढलेले पृथ्वीचे फोटो पंतप्रधान मोदींना सादर केले.
शुभांशू शुक्ला हे २५ जून रोजी फ्लोरिडाहून निघालेल्या आणि २६ जून रोजी आयएसएसवर पोहोचलेल्या अॅक्सिओम-४ खासगी अंतराळ मोहिमेचा भाग होते. ते १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतले.
शनिवारी त्यांनी इंस्टाग्रामवर विमानात बसलेला स्वतःचा एक फोटो पोस्ट केला. त्यांनी लिहिले की, "भारतात परत येण्यासाठी विमानात बसताना माझ्या मनात अनेक भावना निर्माण होत आहेत. या मोहिमेदरम्यान गेल्या एक वर्षापासून माझे मित्र आणि कुटुंब असलेल्या अद्भुत लोकांना मागे सोडून जाण्याचे मला दुःख आहे. तर मोहिमेनंतर पहिल्यांदाच माझे सर्व मित्र, कुटुंब आणि देशातील सर्व लोकांना भेटण्यास मी उत्सुक आहे. मला वाटते की हेच जीवन आहे - सर्वकाही एकसोबत."
यादरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभांशु शुक्ला यांना अलिंगन देत, त्यांचे स्वागत केले. तर शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधानांना त्यांच्या अंतराळ मोहिमेबद्दल आणि अनुभवांबद्दल सविस्तर माहिती दिली.
पंतप्रधान मोदींनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शुभांशू शुक्ला यांच्यासोबतच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. पंतप्रधानांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, शुभांशू शुक्ला यांच्याशी त्यांची खूप चांगली चर्चा झाली. आम्ही त्यांचे अंतराळातील अनुभव, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती आणि भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसह अनेक विषयांवर चर्चा केली. भारताला त्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.