Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

Vice President election news: एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्याशी होणार लढत?
DMK Rajya Sabha MP Tiruchi Siva’s name emerges as INDIA Alliance candidate for the Vice President election.
DMK Rajya Sabha MP Tiruchi Siva’s name emerges as INDIA Alliance candidate for the Vice President election.esakal
Updated on

INDIA Alliance candidate for the Vice President election : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने(NDA) महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना आपले उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल की नाही, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आता विरोधी पक्षांच्या गोटातूनही एक नाव समोर आलं आहे, जे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केलं जाऊ शकतं, अशी चर्चा  सुरू झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, इंडिया आघआडी राज्यसभेचे खासदार तिरुची शिवा यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवू शकते. तिरुची शिवा हे देखील तामिळनाडूचे आहेत. ज्या ठिकाणहूनू सीपी राधाकृष्णन यांना एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. जर असे झाले तर देशाचे पुढील उपराष्ट्रपती दक्षिण भारतातील असतील हे निश्चित मानले जात आहे.

तिरुची शिवा हे तामिळनाडूच्या सत्ताधारी पक्ष द्रमुकचे राज्यसभा खासदार आहेत. तिरुची शिवा हे द्रमुकचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना द्रमुकचे महत्त्वाचे रणनीतीकार मानले जाते. तिरुची शिवा हे दिल्लीत द्रमुकची धोरणे ठरवतात. संसदेत पक्षाची भूमिका काय असेल? हे देखील ते ठरवतात. ते बऱ्याच काळापासून राज्य आणि केंद्रीय पातळीवर पक्षाचा धोरणात्मक चेहरा आहेत. त्यांनी केंद्र आणि राज्य पातळीवर अनेक महत्त्वाच्या समित्या आणि विषयांमध्ये भूमिका बजावली आहे. तिरुची शिवा यांना उमेदवार म्हणून निवडल्याने विरोधी पक्षांना प्रादेशिक राजकारणातील गुंतागुंतींना तोंड देण्यास मदत होऊ शकते.

DMK Rajya Sabha MP Tiruchi Siva’s name emerges as INDIA Alliance candidate for the Vice President election.
CP Radhakrishnan Meet PM Modi: ‘एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

याशिवाय तिरुची शिवा यांनी सामाजिक न्याय, राज्यांचे हित आणि संघराज्य व्यवस्थेवर बरेच काम केले आहे. जर इंडिया अलायन्सने तिरुची शिवा यांचे नाव जाहीर केले, तर हा एक स्पष्ट संदेश आहे की विरोधकांना तामिळनाडूची भूमी मोकळी सोडायची नाही. अशा परिस्थितीत, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल असू शकते.

DMK Rajya Sabha MP Tiruchi Siva’s name emerges as INDIA Alliance candidate for the Vice President election.
2500 Dogs Killed and Buried: ‘’मी तेव्हा २५०० कुत्रे मारून झाडांखाली पुरले होते'’ आमदाराचं थेट विधिमंडळातच विधान!

पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. ही निवडणूक एनडीएने सीपी राधाकृष्णन यांचे नाव पुढे करण्यामागे एक मोठे कारण असल्याचेही म्हटले जात आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजप सीपी राधाकृष्णन यांचे भांडवल करू शकतो. अशा परिस्थितीत, विरोधी गटही तामिळनाडूच्या ज्येष्ठ नेत्याला रिंगणात उतरवू शकतो. त्यात तिरुची शिवा हे दिल्लीच्या राजकारणात बऱ्याच काळापासून सक्रिय देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com