परदेशात जाणाऱ्यांसाठी बूस्टर डोस; कोविनवर लवकरच सुरू होणार सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Government will take a big step on booster dose

परदेशात जाणाऱ्यांसाठी 'बूस्टर डोस'; कोविनवर सुरू होणार नोंदणी

नवी दिल्ली : सर्व भारतीय नागरिक आणि परदेशात प्रवास करणारे विद्यार्थी आता आवश्यकतेनुसार बूस्टर शॉट्ससाठी (Corona Booster Dose) पात्र असतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडिविया (Mansukh Mandaviya) यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी एक ट्वीटदेखील केले आहे. यामध्ये त्यांनी "परदेशात प्रवास करणारे भारतीय नागरिक आणि विद्यार्थी आता प्रवास करणाऱ्या देशाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोनाचा बूस्टर डोस घेऊ शकणार आहेत. यासाठी लवकरच CoWIN पोर्टलवर नव्याने सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Health Minister Mansukh Mandaviya On Precaution Dose)

मांडविया म्हणाले की, 18 वर्षांवरील सर्व नागरिक ज्यांना कोरोनाचा (Corona Vaccination) दुसऱ्या डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत असे सर्वजण बूस्टर डोससाठी पात्र असणार आहेत. याआधीदेखील याबाबत चर्चा करण्यात आली होती. तसेच NTAGI समितीने शिफारस केली होती की, ज्या नागरिकांना विदेशात प्रवास करण्याची गरज आहे. ते निर्धारित नऊ महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीपूर्वी कोरोनाचा बूस्टर डोस घेऊ शकतात.

दरम्यान, सरकारी आकडेवारीनुसार, देशातील फार कमी लोकांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या डोस घेण्याची इच्छा व्यक्त केली असून, 10 एप्रिलपासून देशातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक बूस्टर डोससाठी पात्र असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी केवळ कोरोना लसीचा दुसरा डोस आणि तिसरा डोसमध्ये 9 महिन्यांचे अंतर असावे अशी अट टाकण्यात आली आहे.

Web Title: Indian Citizens Students Travelling Overseas Can Now Take The Precaution Dose Says Health Minister

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top