
मोदींचा आठ वर्षांचा कार्यकाळ म्हणजे एक 'केस स्टडी' : राहुल गांधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारवर ट्वीट करत हल्लाबोल केला आहे. यामध्ये त्यांनी सध्या देशात उद्भवलेल्या कोळसा संकट, वीज संकट, नोकऱ्यांचे संकट, शेतकरी संकट, महागाईचे संकट आदी विषयांचा उल्लेख केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 8 वर्षातील चुकीचा कारभार हा एकेकाळी जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी (Indian Economy) एक असलेल्या देशाचा नाश कसा करायचा याची एक केस स्टडी असल्याची खोचक टीका केली आहे. (Rahul Gandhi Criticism Narendra Modi )
भारतातील बेरोजगारीच्या दरात वाढ
मार्च महिन्यात भारतातील बेरोजगारीचा दर (Unemployment Rate) 7.60 टक्के होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार, जानेवारी आणि डिसेंबरमध्ये अनुक्रमे 6.57 टक्के आणि 7.91 टक्क्यांच्या तुलनेत भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारीमध्ये 8.10 टक्क्यांवर पोहोचला आहे.
'हेट इन इंडिया' आणि 'मेक इन इंडिया' एकत्र राहू शकत नाही
गेल्या काही वर्षात जागतिक ऑटोमोटिव्ह बँड्सने भारतातून काढता पाय घेतला आहे. त्यावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) निशाणा साधला आहे. 'हेट इन इंडिया आणि मेक इन इंडिया एकत्र राहू शकत नाही' असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
देशात उर्जा संकट गडद
गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागात कोळशाचा तुटवडा (Coal Crises) मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांना लोड शेडिंग (Load Shading) सारख्या समस्येला सामोरे जावं लागत आहे. दिवसेंदिवस हे संकट अधिक गडद होत असून, याच फटका अनेक उद्योगांनादेखील बसला आहे. तर दुसरीकडे देशात महागाईनेदेखील (Inflation) उच्चांक गाठला असून, व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 2,355 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. तर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्येदेखील मोठी वाढ झाली आहे. याशिवाय फळे आणि भाज्यांचे भावही गगनाला भिडले आहेत.
Web Title: Indian Economy Collapsed During 8 Years Of Modi Government Says Rahul Gandhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..