esakal | पबजी, टिकटॉकनंतर आणखी 43 अ‍ॅपवर बंदी; भारत सरकारचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

chinese app

 भारत सरकारने जून आणि सप्टेंबरमध्ये काही अ‍ॅपवर बंदी घातली होती. आता पुन्हा एकदा  43 अ‍ॅपवर बंदी घातली आहे.

पबजी, टिकटॉकनंतर आणखी 43 अ‍ॅपवर बंदी; भारत सरकारचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - डोकलाममध्ये झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने चीनविरोधात आक्रमक पावले उचलली होती. त्याचवेळी देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्काराची मोहिमसुद्धा सुरू झाली. त्यानंतर  भारत सरकारने जून आणि सप्टेंबरमध्ये काही अ‍ॅपवर बंदी घातली होती. आता पुन्हा एकदा  43 अ‍ॅपवर बंदी घातली आहे.

भारताच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून 43 मोबाइल अ‍ॅपची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला धोकादायक असल्याचं कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत भारताच्या सुरक्षा मंत्रालयाकडून माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित अ‍ॅप आता वापरता येणार नाहीत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

याआधी 29 जूनला भारत सरकारने 59 अ‍ॅपवर बंदी घातली होती. तर 2 सप्टेंबरला 118 अ‍ॅपवर बंदीची कारवाई केली होती. याआधी बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपमध्ये पबजी, टिकटॉक, वी चॅट, शेअर इट यांसारख्या अ‍ॅपचा समावेश होता. 

loading image