Medicine : औषध खरे की बनावट? ग्राहकांना QR कोड स्कॅन करून मिळणार माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Medicine : औषध खरे की बनावट? ग्राहकांना QR कोड स्कॅन करून मिळणार माहिती

Medicine : औषध खरे की बनावट? ग्राहकांना QR कोड स्कॅन करून मिळणार माहिती

केंद्र सरकार लवकरच औषधांबाबत एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट औषधांची ओळख पटवण्यासाठी आणि त्याचा वापर रोखण्यासाठी केंद्र सरकार ट्रॅक अँड ट्रेस यंत्रणा सुरू करण्याच्या विचारात आहे. पहिल्या टप्प्यात, 300 हून अधिक सर्वाधिक विक्री होणारे औषधांच्या पॅकिंगवर बारकोड किंवा QR कोड छापला जाणार आहे. त्यानंतर ही प्रणाली इतर औषधांमध्ये प्राधान्याने लागू केली जाणार आहे.

हेही वाचा: Chandani Chowk Traffic: चांदणी चौकात आज पुन्हा 'ट्रॅफिक ब्लॉक'

यावर्षी जूनमध्ये सरकारने फार्मा कंपन्यांना त्यांच्या प्राथमिक किंवा दुय्यम पॅकेज लेबलवर बारकोड किंवा QR कोड पेस्ट करण्यास सांगितले होते. मात्र, देशांतर्गत फार्मा उद्योगातील तयारीच्या अभावामुळे ही प्रणाली सुरू करणे रखडले असून, ट्रॅक अँड ट्रेस यंत्रणा पुढील वर्षी एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

हेही वाचा: साडेतीन वर्षाच्या नातीसह संपूर्ण कुटुंब आत्महत्या करू; माजी नगरसेवकाचा एकनाथ शिंदेंना इशारा

गेल्या काही वर्षांत बाजारात बनावट आणि निकृष्ट औषधांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.त्यापैकी काही राज्य औषध नियामकांनी जप्तही केले आहेत. याला आळा घालण्यासाठी सरकारने या महत्त्वाच्या योजनेच्या दिशेने पावले उचलली आहेत. एकदा ही प्रणाली लागू झाल्यानंतर ग्राहक मंत्रालयाने विकसित केलेल्या पोर्टल औषधाला एक युनिक आयडी कोड देऊन त्याची सत्यता पडताळण्यासाठी वापरली जाणार आहे. त्यानंतर मोबाईल फोन किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे याची सत्यता पडताळणे सोपे होणार आहे.

टॅग्स :medicine