भारतीय माध्यमांनीही 'ग्लोबल' झालं पाहिजे- पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
Tuesday, 8 September 2020

कोरोनाकाळात मानसिक रुग्णांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.मानसिक ताण,नैराश्यातून वाचवण्यासाठी केंद्राची एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.यासाठी भारत सरकारने 'किरण'नावाची नवीन हेल्पलाईन सुरू केली आहे.

जयपूर:  'भारतीय माध्यमं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बळकट झाली आहेत, पण भारतीय माध्यमांनाही आताच्या काळात 'ग्लोबल' होणे आवश्यक आहे'. असं मत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदी जयपूरमधील (Jaypur) एका माध्यम संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना, माध्यमांद्वारे सरकारवर टीका करणे स्वाभाविक आहे आणि यामुळे लोकशाहीला बळकटी मिळाली आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. भारतात सध्या कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. कोरोनाकाळात  भारतीय माध्यमांनी कोरोनाविषयी चांगली जनजागृतीसाठी केली आहे. माध्यमांच्या कामाविषयही मोदींनी या कार्यक्रमात कौतुक केलं असून माध्यमाच्या या कामाचं पंतप्रधान मोदींनी 'अभूतपूर्व' सेवा म्हणूनही वर्णन केलं आहे. कोरोनाकाळात मानसिक रुग्णांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मानसिक ताण, नैराश्यातून वाचवण्यासाठी केंद्राची एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी भारत सरकारने 'किरण' नावाची नवीन हेल्पलाईन सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आज भारताच्या स्थानिक उत्पादनांना जागतिक स्तरावर मोठी मागणी असून ती उत्पादने जागतिक स्तरावर जात आहेत. तसेच जागतिक स्तरावर भारताचा आवाजही मजबूत होत असल्याचे पंतप्रधान मोदींनी प्रतिपादन केलं आहे. अशा परिस्थितीत भारताचे माध्यमेही जागतिक होण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितलं. स्वच्छ भारत, उज्ज्वला गॅस योजना आणि जल जीवन मिशन यासारख्या सरकारी योजनांचा प्रसार आणि कोरोनाविरूद्ध जनजागृती यासाठी माध्यमानी मोठी भूमिका बजावले आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 माध्यमांनी सरकारच्या योजनांमधील उणीवा काढणे व त्यावर टीका करणे स्वाभाविक आहे.  सोशल मीडियाच्या युगात हे साहजकिच आहे. आज आपली लोकशाही बळकट झाली आहे, असं बोलून पंतप्रधानांनी स्वावलंबी भारत आणि त्यास विस्तृत करण्यासाठी 'वोकल फॉर लोकल' (vocal for local) ठरावावर भर दिला आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian media also needs to be global said by PM Modi