

Air Chief Marshal Ashutosh Dixit
esakal
New Delhi: देशाच्या सुरक्षेसंदर्भातील सर्वांत संवेदनशील आणि महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी सैन्य दलांतील अधिकाऱ्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. विदेशी हेरगिरी करण्याऱ्या यंत्रणा हनी ट्रॅपचा वापर करून भारतीय सैन्य दलाची गुप्त माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मात्र, या संकटांचा मुकाबला करण्यासाठी सैन्य दलांकडून काय रणनिती अवलंबली जाते, यावर हवाईदल प्रमुख आशुतोष दीक्षित यांनीच भाष्य केले आहे.