Indian milk has aflatoxin m1 causes cancer Photo Credit : downtoearth.org.in
Indian milk has aflatoxin m1 causes cancer Photo Credit : downtoearth.org.in

धक्कादायक! भारतातील दुधात आढळले एफ्लाटॉक्सिन एम-1, कॅन्सरचा धोका

पुणे : कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारा एफ्लाटॉक्सिन एम-1 (एएफएम-1) हा घटक दूधात आढळला आहे. बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या दुधात याचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक बाब अन्न सुरक्षा प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाली आहे.

भारतातील अन्न सुरक्षा प्रशासन (एफएसएसएआय) खाद्यपदार्थांचा दर्जा खाण्या योग्य आहे की नाही याची चाचणी करते. याच अनुशंघाने प्रक्रिया करण्यात अलेल्या दूधाच्या (प्रोसेस्ड मिल्क) काही नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. या सर्वेक्षणातून दूधात एफ्लाटॉक्सिन एम-1चे प्रमाण जास्त असल्याचे अढळून आले. एफ्लाटॉक्सिन मुळे कर्करोग होतो. 

भारतात कोठे किती प्रमाण?   
18 ऑक्टोबर 2019 ला या सर्वेक्षणाचे परिणाम जाहीर करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान ऐकूण 6432 दुधाच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. यातील 368 नमुन्यांमध्ये एफ्लाटॉक्सिनचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 57 टक्के असल्याचे आढळून आले. सर्वेक्षणादरम्यान तमिळनाडू येथील 551 दूधाच्या नमुन्यांपैकी 88, दिल्लीमध्ये 262 पैकी 38, तर केरळमध्ये 187 पैकी 37 नमुन्यांमध्ये एफ्लाटॉक्सिनचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले. याचबरोबर महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश येथील 77 नमुन्यांमध्ये एफ्लाटॉक्सिन एम-1च्या तुलनेत प्रतिजैविकांचे प्रमाण अधिक होते.

कच्चे दूध चांगलेच
प्रक्रिया झालेल्या अर्थात बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या दुधात एफ्लाटॉक्सिनचे प्रमाण जास्त आहे. तर कच्च्या दूधात याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.सर्वेक्षणाच्या परिणामामधून दिसून आले की मालटोडेक्सट्रीन (अन्न पदार्थात भर घातलेला पदार्थ) हा घटक 156 नमुन्यांमध्ये तर, 78 नमून्यांमध्ये  साखरेचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. ऑगस्ट 2018 मध्ये केनिया येथील नैरोबीमध्ये एएफएम-1चा अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासातून स्पष्ट झाले, की एएफएम-1 चे प्रमाण अधिक असलेल्या दूधाचे सेवन करणाऱ्या बहुतेक लोकांमध्ये कर्करोगाची संख्यादेखील जास्त होती. अन्न सुरक्षा प्रशासनाच्या माहितीनुसार दूधात एफ्लाटॉक्सिनचे प्रमाण 0.5 मायक्रोग्राम प्रती किलोग्राम असायला हवी.  

काय आहे एफ्लाटॉक्सिन?
एफ्लाटॉक्सिन हा मानवी शरीरात कर्करोग निर्माण करणारा पदार्थ आहे. एफ्लाटॉक्सिन एका प्रकारचे विष (टॉक्सिन) आहे. ज्याची निर्मिती वैशिष्ट्य प्रकारच्या बुरशींद्वारे म्हणजेच एस्पेरिजिलसमुळे होते. या बुरशींचा वावर कापूसच्या बियाण्यांमध्ये तसेच मका, भुईमुग साऱ्खा बहुतेक पिकांवर असतो. एस्पेरिजिलस या बूरशीच्या तीन जाती म्हणजेच एस्पेरिजिलस फ्लेवस, एस्पेरिजिलस पॅरासिटिकस आणि कधी-कधी एस्पेरिजिलस नॉमियस या एफ्लाटॉक्सिन एम-१ ची निर्मिती करतात. एस्पेरिजिलसच्या या जाती वनस्पती आणि वनस्पतीजन्य पदार्थाना दूषित करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, खाद्यपदार्थांमध्ये एफ्लाटॉक्सिनचे प्रमाण 1 मिलीग्राम प्रती किलोग्राम किंवा अधिक असल्यास एफ्लाटॉक्सिकोसीसची निर्मिती होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com