मुस्लिम नागरिक आमचे बंधू : राजनाथसिंह

वृत्तसंस्था
Sunday, 23 February 2020

अब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी प्रार्थना
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांची नजरकैदेतून सुटका होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी यांची मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

नवी दिल्ली : भारतीय मुस्लिम नागरिक हे आमचे बंधू असून, आमच्या हृदयात आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाची (भाजप) हीच विचारधारा असल्याचे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी म्हटले आहे, की मुस्लिम नागरिकांना आमच्या हृदयात स्थान असल्याने धार्मिक भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नाही. मी यापूर्वीही मेरठ आणि मंगळूर येथील सभेत म्हटले आहे, की भारतीय मुस्लिम नागरिक हे आमचे बंधू आहेत.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) देशभरात मुस्लिम नागरिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना विश्वास देण्याचे काम सरकारमधील मंत्र्यांकडून करण्यात येत आहे. राजनाथसिंह म्हणाले, की काही जण नागरिकांना भरकटविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजप कधीच भारतातील अल्पसंख्यांकांविरोधात जाऊ शकत नाही. सबका साथ, सबका विकास ही आमची घोषणा असून, जात, धर्म आणि वर्णाच्या आधारे भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही याबाबत विचारही करू शकत नाही. काही जण फक्त वोट बँकेचा विचार करतात. 

अब्दुल्ला, मुफ्तींच्या सुटकेसाठी प्रार्थना
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांची नजरकैदेतून सुटका होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी यांची मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian muslims are our brother and near to our heart says Rajnath Singh