Indian Navy Day 2022 : 'हाउज द जोश' राफेल उडवणारी पहिली महिला पायलट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Navy Day

Indian Navy Day 2022 : 'हाउज द जोश' राफेल उडवणारी पहिली महिला पायलट

Indian Navy Day 2022 : देशाच्या तीन सशस्त्र दलांपैकी एक असलेल्या भारतीय नौदलासाठी आजचा दिवस खास आहे. आज भारतीय नौदल दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशात दरवर्षी ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या नौसैनिकांच्या सन्मानार्थ हा विशेष दिवस साजरा केला जातो.

हेही वाचा: आबेंपूर्वी झाला होता एका माजी पंतप्रधानावर हल्ला; नेव्ही ऑफिसरनं घेतले होते प्राण

4 डिसेंबर 1971 रोजी भारतीय नौदलाच्या जवानांनी पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. या दिवशी नौदलाने पाकिस्तानच्या पीएनएस खैबर तसेच अनेक मोठ्या युद्धनौकांवर हल्लाबोल करत त्याचे अस्तित्व नष्ट केले. भारतीय नौदल दिन या दिवशी समुद्रात पाकिस्तानी युद्धनौकांवर भारताचा विजय साजरा करण्यासाठी साजरा केला जातो.

भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी तिन्ही सशस्त्र दलांमध्ये देशातील तरुणांची फौज तैनात आहे. यात आता महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. भारतीय नौदलात अनेक महिला अधिकारी सेवा देत आहेत, आज आपण भारतीय नौदल दिनानिमित्त या महिला अधिकाऱ्यांबद्दल जाणून घेऊया.

हेही वाचा: Indian Navy Day: भारतीय नौदलाच्या 'या' गोष्टी माहिती आहेत का?

भारतीय नौदलात काही दोन वर्षांपूर्वी दोन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुमुदिनी त्यागी आणि रिती सिंह या दोन महिला अधिकाऱ्यांना नौदलाच्या युद्धनौकांमध्ये कमिशन देण्यात आले. या दोघींचीही हेलिकॉप्टर स्ट्रीममध्ये 'ऑब्जर्वर्स' (एयरबोर्न टेक्टीशियंस) म्हणून निवड करण्यात आली. सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रीती सिंग या देशातील पहिल्या महिला एअरबोर्न टॅक्टिक्स बनल्या.

हेही वाचा: Navy Day : 'बिटींग रिट्रीट' सोहळ्याला रशियन नौदलाने लावले चार चाँद!

सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी

कुमुदिनी त्यागी या मूळच्या उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील आहेत. मेरठच्या खारखोडा गावातल्या कुमुदिनी यांनी दहावीनंतर लगेचच सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न सुरू केला. बी.टेक केल्यानंतर दलात भरती होण्याची तयारी सुरू केली. रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी नौदलात प्रवेश मिळवला. डिसेंबर 2018 मध्ये कुमुदिनी नौदलात दाखल झाल्या. कुमुदिनी यांचे वडील सुरक्षा एजन्सी चालवतात. तर, आजोबा सुरेशचंद त्यागी हे पोलीस उपनिरीक्षक होते.

सब लेफ्टनंट रिती सिंह

रिती सिंह यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांनी भारतीय सैन्यात सेवा केली आहे. रिती यांचे वडील एसके सिंग हे भारतीय नौदलातून निवृत्त झाले आहेत तर आई इंग्रजीच्या शिक्षिका आहेत. रिती यांचा जन्म 1996 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये झाला. त्यानंतर 2002 मध्ये त्या कुटुंबासह हैदराबादला शिफ्ट झाल्या.

हेही वाचा: Navy Agniveer Recruitment 2022 : बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी

राफेल उडवणारी पहिली महिला पायलट

भारतीय वायुदलात अनेक शक्तिशाली लढाऊ विमानांचा समावेश आहे. ही विमाने चालवण्यासाठी नौदलात अनेक दिग्गज वैमानिक आहेत. शिवांगी सिंग या त्यापैकीच एक आहेत. शिवांगी या पहिल्या महिला वैमानिक आहेत. ज्यांनी राफेल सारखे शक्तिशाली लढाऊ विमान चालवले. शिवांगी सिंग या उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील रहिवासी आहे. शिवांगी यांचे आजोबा व्हीएन सिंह सैन्यात कर्नल होते.

लहानपणापासून होते लढाऊ विमान उडवण्याचे स्वप्न

शिवांगी यांना लहानपणापासूनच लढाऊ विमान उडवण्याचे स्वप्न होते, २०१७ मध्ये देशाच्या पाच महिला लढाऊ विमान वैमानिकांच्या टीममध्ये त्यांची निवड करण्यात आली. शिवांगी यांनी मिग 21 देखील उडवले आहे. याशिवाय त्यांनी २०१३ मध्ये प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व केले.