नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे ‘थिएटर लेव्हल ऑपरेशनल २०२५’ सराव (ट्रॉपेक्स) हिंदी महासागरात नुकताच झाला. या सरावाच्या माध्यमातून नौदलाच्या विविध ऑपरेशनल क्षमतांना सादर करण्यात आले..तीन महिन्यांच्या कालावधीत होणारा सराव जानेवारी ते मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला. यामध्ये पाण्यातून हवेत मारा करण्याबरोबर अचूकपणे लक्ष्य भेदण्यासाठी शस्त्रास्त्रांचा वापर करणारा ‘जॉइंट वर्क-अप’ टप्पा, सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि एक रणनीतिक टप्पा, अशा स्वरूपात सरावाची रचना केली होती. या सरावाने राष्ट्रीय सागरी सुरक्षा हितांचे रक्षण करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने विविध आव्हानांना प्रतिसाद देण्याच्या नौदलाच्या क्षमतेचे मूल्यांकन प्रदान केले. .दलांमध्ये समन्वय ‘ट्रॉपेक्स’मध्ये ६५ ते ७० भारतीय नौदल जहाजे, नऊ ते १० पाणबुड्या आणि विविध प्रकारच्या ८० हून अधिक विमानांचा सहभाग होता. या सरावात ऑपरेशनल परिस्थितीमध्ये इतर सेवांसह नियोजन आणि अंमलबजावणीसाठी समन्वय साधण्यात आला..Employee Theft : नोकराकडून २ लाख ३५ हजारांची अफरातफर.यात भारतीय नौदलासह लष्कर, भारतीय हवाईदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या सुखोई-३०, जग्वार, ‘सी-१३०’, फ्लाइट रिफ्युएलर आणि एडब्ल्यूएसीएस विमाने, ६०० हून अधिक पायदळातील सैनिक आणि १० हून अधिक आयसीजी जहाजे, यांचा समावेश असलेल्या युनिट्सचा व्यापक सहभाग दिसून आला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.