Indian Navy : नौदलाच्या ‘तारिणी’चे गोव्याकडे प्रस्थान
Panaji News : भारतीय नौदलाची शिडाची नौका ‘तारिणी’ ही केपटाऊन येथून परतीच्या प्रवासासाठी निघाली असून मे महिन्यात गोव्यात पोहोचणार आहे. ही मोहीम महासागरी नौकाविहाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे.
पणजी : गोव्यातून मागील वर्षी २८ सप्टेंबरला जागतिक प्रवासावर गेलेली भारतीय नौदलाची ‘तारिणी’ ही शिडाची नौका आज दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून परतीच्या प्रवासाला निघाली आहे.