Indian Politics : देशातील ४० टक्के मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हे ‘एडीआर’च्या विश्लेषणातील माहिती, १० जणांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद
Chief Ministers India : देशातील १२ मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असून, त्यापैकी १० मुख्यमंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्याचा एडीआर संस्थेचा अहवाल धक्कादायक आहे.
नवी दिल्ली : देशातील ३० पैकी १२ मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असून, एकूण मुख्यमंत्र्यांमध्ये हे प्रमाण ४० टक्के आहे. यातील १० मुख्यमंत्र्यांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.