Indian Railway : PNR टाका अन् व्हॉट्सअपवरून मागवा जेवण; वाचा काय आहे IRCTC ची योजना

भारतीय रेल्वेने प्रवाशांना ई-कॅटरिंग सेवेद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअपचा पर्याय दिला आहे.
IRCTC
IRCTC Sakal

Food Order While Traveling In Indian Railway : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आली आहे.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

IRCTC
Whatsapp New Feature : आता स्टेटसवरून ऐकू जाणार तुमचा आवाज; आलं व्हॉट्सअ‍ॅपचं अप्रतिम फीचर

आता प्रवासी त्यांचा पीएनआर नंबर वापरून प्रवासादरम्यान व्हॉट्सअपद्वारे ऑनलाइन जेवण ऑर्डर करू शकणार आहेत. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून एक निवेदन जारी केले आहे.

या निवेदनात रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, रेल्वेने ई-कॅटरिंग सेवा अधिक ग्राहक-केंद्रित करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. याद्वारे भारतीय रेल्वेने प्रवाशांना ई-कॅटरिंग सेवेद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअपचा पर्याय दिला आहे.

IRCTC
Mumbai Police Alert : PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबई पोलीस सतर्क; 'या' गोष्टींवर असणार बंदी

प्रवास करताना प्रवासी व्हॉट्सअपद्वारे जेवण कसे ऑर्डर करू शकतात याची प्रक्रिया रेल्वेने आपल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये स्पष्ट केली आहे. जेवण मागवण्यासाठी रेल्वेतर्फे +91-8750001323 हा व्हॉट्सअप क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

IRCTC
Dell Layoff : मंदीचं मळभ अधिक गडद! डेल देणार 6,600 हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ
  • तिकीट बुक करताना, www.ecatering.irctc.co.in या लिंकवर क्लिक करून ई-कॅटरिंग सेवा निवडण्यासाठी प्रवाशांना संबंधित व्हॉट्सअपनंबरवरून मेसेज पाठवला जाईल.

  • त्यानंतर प्रवाशी थेट वेबसाइटवरून मार्गात असलेल्या स्थानकांवर उपलब्ध त्यांच्या पसंतीच्या रेस्टॉरंटमधून जेवण बुक करू शकणार आहेत.

  • यानंतर, व्हॉट्सअप नंबर दोन मार्ग संचार मंच म्हणून सक्षम होईल. एआय पॉवर चॅटबॉट प्रवाशांच्या ई-कॅटरिंग सेवेच्या सर्व प्रश्न हाताळेल.

IRCTC
भारतीय रेल्वे होणार अधिक सुरक्षित, 4G स्पेक्ट्रमला केंद्राची मंजुरी
  • रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, IRCTC च्या ई-कॅटरिंग सेवांद्वारे एका दिवसात सुमारे ५०,००० प्रवाशांना जेवण दिले जाणार आहे.

  • प्रवाशांच्या प्रतिक्रिया आणि सूचनांच्या आधारे निवडक गाड्यांमध्ये ई-कॅटरिंग सेवांसाठी WhatsApp कम्युनिकेशन लागू करण्यात आले आहे. त्यानंतर कालांतराने ही सेवा इतर रेल्वेगाड्यांमध्ये सुरू केली जाणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com