Indian Railway : हे 5 विश्वविक्रम भारतीय रेल्वेच्या नावावर, ऑस्ट्रेलिया-ब्रिटनलाही सोडलं मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ केला
Indian Railway
Indian Railway

World Record : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ केला. या योजनेद्वारे देशातील 1309 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. योजनेच्या शुभारंभाच्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 9 वर्षांत आम्ही दक्षिण आफ्रिका, युक्रेन, पोलंड, यूके आणि स्वीडनमधील रेल्वे नेटवर्कपेक्षा मोठे रेल्वे ट्रॅक भारतात टाकले.

गेल्या वर्षी दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील ट्रॅकच्या संख्येपेक्षा जास्त ट्रॅक भारतात तयार करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांत भारतीय रेल्वेने असे विक्रम केले ज्याने जगातील अनेक देशांना मागे टाकले. पण भारताने रेल्वे ट्रॅकबाबत असे कोणते विक्रम केले आहेत, ज्यांच्यामुळे जगातील आघाडीचे देश देखील मागे राहिले आहेत?

Indian Railway
Women Fashion Tips: लग्नापासून ते कॅज्यूअल वेअरपर्यंत सर्वांसाठी परफेक्ट असा एकमेव सूट

1. भारतात जगातील सर्वात लांब रेल्वे स्टेशन

भारताने सलग दोनदा जगातील सर्वात लांब रेल्वे स्थानक बांधण्याचा विक्रम केला. पहिल्यांदा गोरखपूर स्थानकाला जगातील सर्वात लांब रेल्वे स्थानक बनविण्याचा जागतिक विक्रम केला गेला. या स्थानकाची लांबी 1366.4 मीटर आहे. पण मार्च 2023 मध्ये भारताने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागातील हुबळी रेल्वे स्थानकाला देशातील सर्वात लांब रेल्वे स्थानक बनवले. 20.1 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म 8 ची लांबी 1507 मीटर होती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचा समावेश करण्यात आला.

Indian Railway
Parenting Tips From Nita Ambani : अंबानी कुटुंबात मुलांसाठी होते हे नियम, खुद्द ईशा अंबानीने सांगितले

2. कालका-शिमला-रेल्वेचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश

2003 मध्ये कालका शिमला रेल्वेचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला. एवढ्या उंचीवर 96 किलोमीटर लांब प्रवास करणाऱ्या कालका-शिमला रेल्वेने हा विक्रम केला आहे. ही अभियांत्रिकीची जादू असल्याचं म्हटलं गेलं. ही रेल्वे ताशी 22 किलोमीटर वेगाने धावते. 2008 मध्ये युनेस्कोनेही या ट्रेनचा जागतिक वारसा यादीत समावेश केला होता.

Indian Railway
Driving Tips : Car Dashboard वर असलेल्या लाइट्सचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे का?

3. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त भारतीय रेल्वे प्रवासी

भारतीय रेल्वेचं नेटवर्क इतकं मोठं आहे की ऑस्ट्रेलियातील लोकसंख्येपेक्षा जास्त प्रवासी भारतात प्रवास करतात. भारतीय रेल्वेत दररोज सुमारे 3 कोटी लोक प्रवास करतात. तर ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2.57 कोटी आहे.

Indian Railway
Ayurvedic Tips : पावसाळ्यात दूध पिल्याने त्रास होतो? आयुर्वेदानुसार योग्य पद्धत जाणून घ्या

4. भारतात जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क

भारतीय रेल्वेचं नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. जवळपास 68 हजार किलोमीटर इतकं. यात अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा नंबर लागतो. सध्या भारतात 7 हजारांहून अधिक रेल्वे स्थानकं आहेत. 13 हजारांहून अधिक प्रवासी गाड्या आहेत. 45 हजार किलोमीटरचे विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क आहेत. हे इतके जुने आहेत की आजही अशी शेकडो रेल्वे स्थानके आहेत जी इंग्रजांनी बांधली होती.

Indian Railway
Mobile Tips : तुटलेल्या स्क्रीनचा स्मार्टफोन वापरणं ठरू शकतं घातक! आजच बदलून घ्या मोबाईलचा डिस्प्ले

5. जगातील 10 वे सर्वात रोजगारक्षम नेटवर्क

भारतीय रेल्वे केवळ नेटवर्कच्या बाबतीतच नाही तर रोजगार देण्याच्या बाबतीतही जगातील अनेक देशांच्या पुढे आहे. रोजगार देण्याच्या दृष्टीने ते जगातील दहाव्या क्रमांकाचे मोठे नेटवर्क आहे. सध्या भारतीय रेल्वेत 13 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com