
हायड्रोजनवर चालणारी इंजिने बनवण्यात भारताने चीनला मागे टाकले आहे. देशात शून्य-उत्सर्जन तंत्रज्ञान असलेल्या हायड्रोजन ट्रेनची चाचणी सुरू झाली आहे. भारतीय रेल्वेने जगातील सर्वात जास्त हॉर्सपॉवर असलेले हायड्रोजन इंजिन तयार केल्याचा दावा करण्यात आला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केले की, भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच येत आहे.