
रेल्वेने आपल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, राजपत्रित नसलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा कामावर ठेवले जाईल. रेल्वेमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सोपी, कार्यक्षम करण्यासाठी तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांच्या सेवा सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.