

Indian Railways introduces Emergency Quota facility in Amrit Bharat and Vande Bharat Sleeper trains to accommodate urgent passenger bookings.
esakal
Indian Railways Emergency Quota in Amrit Bharat Train and Vande Bharat Sleeper : अमृत भारत ट्रेन आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये आता आपत्कालीन कोटा लागू केला जात आहे. रेल्वे बोर्डाने एक आदेश जारी केला आहे. आतापर्यंत या ट्रेनमध्ये फक्त महिला कोटा, अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि ड्युटी पास कोटा लागू होता. आता विशेष परिस्थितीत प्रवाशांना जागा/बर्थ मिळवणे सोपे होईल.
सात किंवा त्याहून अधिक स्लीपर कोच असलेल्या अमृत भारत ट्रेनमध्ये २४ बर्थचा आपत्कालीन कोटा निश्चित करण्यात आला आहे. तर वंदे भारत स्लीपर गाड्यांमध्ये वेगवेगळ्या क्लासमध्ये आपत्कालीन कोटा असेल.
रेल्वेने सांगितले आहे की हा कोटा एआरपी म्हणजेच अॅडव्हान्स रिझर्वेशन पिरियड किंवा नो-बुकिंग तारीख, यापैकी जे आधी असेल त्या तारखेपासून लागू केला जाईल. यामुळे जर कुणाला अचानक प्रवास करावा लागला तर तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल. विशेष गरजा असलेल्या प्रवाशांना हा मोठा दिलासा आहे.
तर रेल्वे वेळोवेळी मागणीनुसार कोटामध्ये बदल करू शकेल. रेल्वे बोर्डाच्या मते, झोनल रेल्वे गरज आणि सीट उपलब्धतेनुसार आपत्कालीन कोटा समायोजित करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.