esakal | रेल्वे तिकीटावरील प्रवाशाचे नावही बदलता येणार; IRCTCची सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

railway

प्रवाशाऐवजी त्याच्या कुटुंबीयांपैकी अन्य कोणाला प्रवास करणे अत्यावश्‍यक असेल त्यांचे (एकाच प्रवाशाचे) नावही कन्फर्म तिकीटावरही बदलता येऊ शकेल.

रेल्वे तिकीटावरील प्रवाशाचे नावही बदलता येणार; IRCTCची सुविधा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - तुम्ही रेल्वेचा प्रवास करू शकत नसाल किंवा तुमच्याऐवजी आई, वडील, भाऊ, बहीण किंवा पत्नीला प्रवास करायचा असेल तर तुमच्या ऑनलाइन कन्फर्म तिकीटावरील प्रवाशाच्या नावातही आता बदल करता येऊ शकेल. ‘आयआरसीटीसी’ने याबाबतची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

अनेक प्रवासी नाव लिहिताना चुका करतात, त्यांच्या ओळखपत्राशी नाव जुळत नसेल तर तिकीट तपासनीस कारवाईचा बडगा उगारतात. परिणामी अशा प्रवाशांना तिकीट रद्द करावे लागते किंवा त्यांना प्रवास करता येत नाही. अशा स्थितीत त्या प्रवाशाऐवजी त्याच्या कुटुंबीयांपैकी अन्य कोणाला प्रवास करणे अत्यावश्‍यक असेल त्यांचे (एकाच प्रवाशाचे) नावही कन्फर्म तिकीटावरही बदलता येऊ शकेल. मात्र त्यासाठी गाडी सुटण्याच्या २४ तास आधी रेल्वे आरक्षण केंद्रावर ऑनलाइन तिकीट व संबंधित कागदपत्रे घेऊन जाणे आवश्‍यक आहे. ती दिल्यावर काही मिनिटांत प्रवाशांच्या नावात बदल करण्यात येईल.

हे वाचा - UNLOCK 6 - शाळांसाठी मिशन बिगीन अवघडच; केंद्राच्या कठोर दिशानिर्देशाचे आव्हान

कसे बदलाल तिकीटावरील नाव ?
- ऑनलाइन तिकीटाची व दोघाही संबंधितांच्या ओळखपत्रांची झेरॉक्‍स काढावी.
- आपल्या शहरातील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर जावे.
- तेथून एक अर्ज घेऊन त्यावर जे प्रवास करणार असतील त्यांचे नाव, पत्ता लिहावे.
- त्यांची सारी कागदपत्रे अर्जाला जोडून व एखाद्याची मूळ प्रत त्यांना दाखवून तो तेथील कर्मचाऱ्याकडे द्यावा.
- कन्फर्म तिकीटावर आई, वडील, सख्खे भाऊ-बहीण, पती- पत्नी यांच्या नावांत (एकाच प्रवाशाच्या) बदल होऊ शकतो.
- तिकीट काढणारा व नंतर प्रवास करणारा एकच प्रवासी असावा.

एका वेळी एकाच तिकीटासाठी ही सुविधा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही सुविधा दिल्लीसह काही प्रमुख शहरांत सुरू झाली असून देशभरातही ती लागू करण्यासाठी आयआरसीटीसी संकेतस्थळात तांत्रिक बदल करण्याचे काम सुरू आहे. कोरोनाकाळात नेहमीच्या रेल्वेगाड्या गेले ८ महिने बंद आहेत. त्याऐवजी त्याच मार्गावर पण वेगळ्या क्रमांकासह विशेष रेल्वेगाड्या चालविल्या जात आहेत. यातील अनेक गाड्यांचे तिकीट दर चढे असून त्यामध्ये माजी मंत्री-खासदार, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आदींना मिळणाऱ्या तिकीट दराच्या सवलती तूर्त बंद आहेत.

loading image
go to top