esakal | Breaking: रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात तिप्पटीने वाढ; गोंधळानंतर रेल्वे मंत्रालयाचा खुलासा

बोलून बातमी शोधा

railway_platform}

या तिकिटांचे दर याआधीही कमी जास्त करण्यात आले आहेत. ही सामान्य प्रक्रिया आहे आणि या दरवाढीत नवीन काही नाही.

Breaking: रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात तिप्पटीने वाढ; गोंधळानंतर रेल्वे मंत्रालयाचा खुलासा
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने मुंबई पाठोपाठ दिल्लीसह देशभरातील प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर शुक्रवारी (ता.५) एकदम तिप्पटीने वाढविले. यावरून चर्चा सुरू होताच, "ही तात्पुरती व्यवस्था आहे आणि कोरोना काळात रेल्वे स्थानकांवरील अनावश्‍यक गर्दी कमी व्हावी ,या उद्देशाने ही दरवाढ करण्यात आली आहे,' अशी सारवासारव रेल्वेतर्फे करण्यात आली.

भारतीयांच्या हाती अमेरिकेची सूत्रे; राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केलं कौतुक​

याआधी या तिकिटांचे दर रेल्वेने अशाच एका अचानक धक्कातंत्र निर्णयात ५ वरून १० रुपये केले होते. कोरोना लॉकडाउननंतर दीर्घकाळ प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्रीही बंद होती. ती नुकतीच सुरू करण्यात आली. अलीकडे मुंबईतील प्लॅटफॉर्म तिकीट दहा रुपयांवरून पाचपटींनी वाढवून ५० रुपये करण्यात आले. त्यापाठोपाठ दिल्लीसह देशभरातील स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांचे दरही प्रत्येकी १० वरून ३० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. प्लॅटफॉर्म तिकीटांतील ही वाढ अचानकपणे जाहीर झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. दिल्लीतील गर्दीच्या तीनही स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर प्रत्येकी ३० रुपये करण्यात आले.

Corona Updates: लसीकरण आणखी स्वस्त होणार, भारत बायोटेकने दिली मोठी खुशखबर!​

मंत्रालयाने दिलेल्या खुलाशानुसार, या तिकिटांचे दर याआधीही कमी जास्त करण्यात आले आहेत. ही सामान्य प्रक्रिया आहे आणि या दरवाढीत नवीन काही नाही. सध्याच्या कोरोना काळात प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच आताची दरवाढ करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवरील अनावश्‍यक गर्दी कमी व्हावी हा यामागील उद्देश आहे. जे विनाकारण रेल्वे फलाटावर येतात त्यांची संख्या व गर्दी कमी व्हावी हा यामागील उद्देश असल्याचे रेल्वेने सांगितले. या वेळी विनाकारण प्लॅटफॉर्म तिकिटे काढणाऱ्यांची संख्या किती आहे, हे स्पष्ट केलेले नाही.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)