Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

Indian Railways announces: बिहारसाठी वंदे भारतसह चार नवीन अमृत भारत गाड्यांची घोषणा
Indian Railways to operate over 12,000 special trains during Diwali and Chhath festivals to handle massive passenger rush.
Indian Railways to operate over 12,000 special trains during Diwali and Chhath festivals to handle massive passenger rush. esakal
Updated on

यावर्षी दिवाळी आणि छठ पूजा हंगामात देशभरात १२ हजारांहून अधिक विशेष रेल्वे चालवल्या जातील, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली. याशिवाय, रेल्वेमंत्र्यांनी बिहारसाठी नवीन वंदे भारत आणि चार नवीन अमृत भारत रेल्वे गाड्यांची घोषणाही केली.

याचबरोबर त्यांनी सांगितले की, बिहारमधील पूर्णिया ते पाटणा अशी आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरू केली जाईल, तर गयाजी ते दिल्ली, सहरसा ते अमृतसर, छपरा ते दिल्ली आणि मुझफ्फरपूर ते हैदराबाद अशी चार नवीन अमृत भारत ट्रेन अनुक्रमे धावतील.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, नवीन धोरणानुसार, या सणासुदीच्या काळात १३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान प्रवास केल्यास त्यांच्या परतीच्या भाड्यात २० टक्के सूट देऊन कन्फर्म तिकीट मिळेल.

Indian Railways to operate over 12,000 special trains during Diwali and Chhath festivals to handle massive passenger rush.
Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

आगामी गणेश चतुर्थी, दसरा, दीपावली आणि छठ सणांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, दक्षिण पश्चिम रेल्वेने यशवंतपूर आणि सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरू येथून विविध ठिकाणी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवा नियमित गाड्यांमधील गर्दी कमी करण्यास आणि सणांना जाणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर प्रवास पर्याय प्रदान करण्यास मदत करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com