

भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट बूकिंग प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक बनवण्यासाठी काही पावलं उचलली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वेकडून रेलवन अॅप लाँच करण्यात आलं होतं. या अॅपच्या माध्यमातून फक्त आरक्षितच नव्हे तर अनारक्षित तिकीटही बूक करता येतात. यासोबतच हे अॅप रेल्वेशी संबंधित वेगवेगळ्या सेवांशी संबंधित कामही करते.