३१ मार्चपर्यंत रेल्वे सेवा रद्द?; जाणून घ्या काय आहे सत्य

trains cancelled till 31st march 2021 viral news fact check
trains cancelled till 31st march 2021 viral news fact check

Fact Check : गेल्या वर्षभरापासून थैमान घालणाऱ्या करोनाची दुसरी लाट देशात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशात लॉकडाउन होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. यामध्येच आता हळूहळू पूर्वपदावर येणारी रेल्वेसेवादेखील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्येही अशा प्रकारचा दावा केला असून या संबंधीचे अनेक मेसेजदेखील सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. मात्र, आता याप्रकरणी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ( PIB) या संस्थेने स्पष्टीकरण दिलं आहे.

पीआयबी फॅक्ट चेक -

पीआयबी फॅक्ट चेक ही केंद्र सरकारच्या पॉलिसी, योजना किंवा विभाग मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार थांबवण्यासाठी काम करते. सरकारशी संबंधित कोणत्याही बातमी सत्य आहे की असत्य हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते.

जाणून घ्या काय आहे सत्य -

३१ मार्चपर्यंत देशातील रेल्वेसेवा रद्द करण्यात आल्याचा एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने  व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, व्हायरल होत असलेला मेसेज दिशाभूल करणारा आहे. पीआयबीच्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२१ पर्यंत रेल्वेसेवा बंद ही माहिती चुकीची आहे. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com