थंडीमुळे रेल्वे वाहतूक ठप्प, विशेष-लोकलसह 498 गाड्या रद्द | Indian Railways | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian railways

थंडीमुळे रेल्वे वाहतूक ठप्प, विशेष-लोकलसह 498 गाड्या रद्द

भारतातील अनेक भागांमध्ये तीव्र थंडीची (cold wave) लाट आल्याने भारतीय रेल्वेने (indian railway) आज (ता.२८) ४९८ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर काही विशेष गाड्याही (railway local trains) रद्द करण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर

26 गाड्यांची सुरुवातीची स्थानके बदलण्यात आली

थंडीची लाट वाढल्याने भारतीय रेल्वेकडून गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी रद्द झालेल्या गाड्यांव्यतिरिक्त, 26 गाड्यांची सुरुवातीची स्थानके बदलण्यात आली, तर खराब हवामानामुळे इतर 32 गाड्यांना शॉर्ट टर्मिनेट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, आसाम, हिमाचल प्रदेश, नवी दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, गुजरात, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेश दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन तपशील हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी 27 जानेवारी रोजी किमान 529 आणि 26 जानेवारी रोजी 1267 गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.

भारतीय हवामान खात्याने गुरुवारी सांगितले की, येत्या तीन दिवसांत उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य आणि लगतच्या पूर्व भारतावर थंडीची लाट कायम राहील. तसेच अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. यापूर्वी 27 जानेवारी रोजी तब्बल 529 आणि 26 जानेवारी रोजी 1267 गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. उत्तर रेल्वेच्या म्हणण्यानुसार, धुक्यामुळे दृश्यमानताही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. यापूर्वी 15 जानेवारीलाही रेल्वेने गाड्या रद्द केल्या होत्या.

हेही वाचा: भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणः आरोपींना 6 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

रद्द करण्यात आलेल्या रेल्वेची यादी

08132 BADAMPAHAR (BMPR)-TATANAGAR JN (TATA)

08740BILASPUR JN (BSP)-SHAHDOL (SDL)

09448PATNA JN (PNBE)-AHMEDABAD JN (ADI)

12053HARIDWAR JN (HW)-AMRITSAR JN (ASR)

12054AMRITSAR JN (ASR)-HARIDWAR JN (HW) JSH

12179LUCKNOWJN (LJN)-AGRA FORT (AF) SUF

12180AGRA FORT (AF)-LUCKNOWJN (LJN) SUF

12267MUMBAI CENTRAL (MMCT)-HAPA (HAPA) DRNT

12268HAPA (HAPA)-MUMBAI CENTRAL (MMCT) DRNT

12327HOWRAH JN (HWH)-DEHRADUN (DDN) SUF

12365PATNA JN (PNBE)-RANCHI (RNC) JSH

12366RANCHI (RNC)-PATNA JN (PNBE) JSH

12368ANAND VIHAR TERMINAL (ANVT)-BHAGALPUR (BGP) SUF

12529PATLIPUTRA (PPTA)-LUCKNOWJN (LJN) SUF

12530LUCKNOWJN (LJN)-PATLIPUTRA (PPTA) SUF

12987SEALDAH (SDAH)-AJMER (AII) SUF

14211AGRA CANTT (AGC)-NEW DELHI (NDLS) MEX

14235VARANASI JN (BSB)-BAREILLY (BE) MEX

52596 DJ-GHUM-DJ जॉय राईड,

47105 HYB-LPI,

37811 HWH- BWN M/LOCAL,

37216 BDC-HWH लोकल,

18104 ASR-टाटा जालीनवालाबाग एक्स्प्रेस,

132333332332 ASR-टाटा जालीनवालाबाग EXP,

1323333323333100 ASR-टाटा जालिनवालाबाग EXP

हेही वाचा: भारत बायोटेक : इंट्रानेसल बूस्टर डोसच्या ट्रायलला DGCI ची परवानगी

Web Title: Indian Railways Update Winter Continues In India 498 Trains Cancelled Rescheduled Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top