चार्ट तयार झाल्यानंतर कॅन्सल केलेल्या रेल्वे तिकिटावर मिळणार रिफंड

भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात.
Indian Railways
Indian Railwaysesakal
Updated on
Summary

भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात.

रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी. भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात, त्यामुळे रेल्वेशी संबंधित ताज्या अपडेट्सची (Indian Railways Latest Update) माहिती ठेवणे आवश्यक असते. अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीमुळे रेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतरही तुम्हाला रेल्वेचं तिकीट रद्द करावं लागतं. अशा परिस्थितीतही तुम्हाला तिकीट रद्द झाल्याचा परतावा (Refund) मिळणार आहे. भारतीय रेल्वेने म्हटले आहे की, काही कारणास्तव चार्ट तयार झाल्यानंतर जर तुम्ही ट्रेनचं तिकीट रद्द केलंत, तरीही तुम्ही रिफंडचा दावा करू शकता.

Indian Railways
Indian Railways l रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय; आता प्रवास होणार स्वस्तात

IRCTCने दिली माहिती

IRCTCने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, प्रवास न करता तिकीट रद्द करण्यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railways) परतावा (Refund) देते. त्यासाठी रेल्वेच्या नियमानुसार तिकीट ठेव पावती (TDR) जमा करावी लागेल.

असा ऑनलाइन TDR दाखल करा

- यासाठी सर्वांत पहिल्यांदा 'IRCTC'च्या www.irctc.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

- आता होम पेजवर जाऊन My Accountवर क्लिक करा

- आता ड्रॉप डाऊन मेन्यूवर जाऊन My transaction वर क्लिक करा.

- येथे तुम्ही File TDR पर्यायातील एक पर्याय निवडून File TDR बनवू शकता.

- आता ज्या व्यक्तीच्या नावावर तिकीट बुक केले आहे, त्याची माहिती तुम्हाला दिसेल.

- आता येथे आपण आपला पीएनआर नंबर, ट्रेन नंबर आणि कॅप्चा भरा आणि रद्द करण्याच्या नियमांच्या बॉक्सवर टिक करा.

- आता सबमिट बटणावर क्लिक करा.

- यानंतर बुकिंगच्या वेळी फॉर्ममध्ये दिलेल्या नंबरवर OTP मिळेल.

- येथे OTP टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.

- PNR डिटेल्स व्हेरिफाय करून कॅन्सल तिकीट पर्यायावर क्लिक करा.

- येथे तुम्हाला पृष्ठावर Refundची रक्कम दिसेल.

- बुकिंग फॉर्मवर दिलेल्या नंबरवर PNR आणि Refundबद्दल सविस्तर माहिती असलेला कन्फर्मेशन मेसेज मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com