

Murlidhar Mohol
sakal
दर्जेदार बियाणांचे उत्पादन, खरेदी आणि वितरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडने २०३३ पर्यंत जगातील सर्वात मोठ्या पाच बियाणे उत्पादक कंपन्यांमध्ये स्थान मिळवून २५ हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे, अशी माहिती आज केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.