Indian in China : भारतीय विद्यार्थ्याचा चीनमध्ये मृत्यू; मृतदेह मिळवण्यासाठी घरच्यांची धडपड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian student in China
Indian in China : भारतीय विद्यार्थ्याचा चीनमध्ये मृत्यू; मृतदेह मिळवण्यासाठी घरच्यांची धडपड

Indian in China : भारतीय विद्यार्थ्याचा चीनमध्ये मृत्यू; मृतदेह मिळवण्यासाठी घरच्यांची धडपड

चीनमध्ये शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याचा प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाला आहे. आता त्याच्या घरचे त्याचा मृतदेह भारतात आणण्याची मागणी करत आहेत.

अब्दुल शेख हा २२ वर्षीय भारतीय विद्यार्थी गेल्या पाच वर्षांपासून चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तो ११ डिसेंबर रोजी भारतात परतला होता, पण त्यानंतर तो पुन्हा इंटर्नशिपसाठी परतला. अब्दुल इंटर्नशिप करत असतानाच तो आजारी पडला.

त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं, पण तिथेच त्याचा मृत्यू झाला.आता त्याच्या कुटुंबीयांना त्याचा मृतदेह हवा आहे. त्यासाठी त्याचा परिवार परराष्ट्र मंत्रालयाकडे विनंती करत आहे. जेणेकरून त्याचा परिवार त्याचे अंत्यविधी करू शकेल.

टॅग्स :Medical Student