Crime News
sakal
देश
Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ
Indian Student: अमेरिकेतील डल्लास येथे हैदराबादच्या २७ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तेलंगण सरकारने पार्थिव भारतात आणण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले आहे.
हैदराबाद : अमेरिकेतील डल्लास येथे २७ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मूळचा हैदराबादचा निवासी असलेला चंद्रशेखर पोल एका पेट्रोल पंपावर काम करत असताना शुक्रवारी रात्री त्याच्यावर अज्ञात हल्लेखोराने गोळी झाडली, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

