नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांना बंदी; जाणून घ्या कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nepal

नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांना बंदी; जाणून घ्या कारण

कोरोनाच्या सतर्कतेच्या दुष्टिने भारतीय पर्यटकांना नेपाल मध्ये पर्यटनास येण्यासाठी बंदी घालण्यास आली आहे. कोरोना तपासणी दरम्यान भारतातील काही पर्यटक कोरोना संक्रमित आढळल्याने त्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या पर्यटकांमध्ये 4 लोक संक्रमित आल्याने त्यांना परत भारतात पाठव्यात आले आहे.

या देशात कोरोना वायरस झपाट्याने वाढत आहे. त्या मुळे नेपाळ सरकारने हा निर्णय घेतला आहे, भारतातील हे पर्यटक पश्चिम नेपालच्या बैताडी जिल्हातील झूलाघाट सिमेच्या द्वारा नेपाल मध्ये पोहचले होते, बैताडी मधील आरोग्य आधिकाऱ्याने सांगितल की 4 भारतीय पर्यटक कोरोना बाधित झाले आहेत.

हेही वाचा: पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बुरे दिन, इतर देशांपुढे हात पसरण्याची आली वेळ

ते म्हणाले की, भारतातून आलेल्या अनेक नेपाळी नागरिकांना कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ते म्हणाले की ज्या भारतीय पर्यटकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्यांना देशात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. बैताडी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा धोका खूप जास्त आहे, कारण त्याची सीमा भारताला लागून आहे.

जिल्ह्यात सध्या 31 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात संक्रमितांची संख्या 4,41,74,650 झाली आहे. तर आकडेवारीनुसार मृतांची संख्या 5,26,772 वर पोहोचली आहे.

Web Title: Indian Tourists Banned Nepal Tourists Test Covid Positive

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Indiacovid19nepalTourisim