भारतीय स्त्रिया भाग्यवान, मनुस्मृतीमुळे मानाचं स्थान; महिला न्यायाधीशाचं विधान

आशियाई देश महिलांना सन्मान देण्यात खूप पुढे आहेत, असंही त्या म्हणाल्या आहेत.
Pratibha M Singh
Pratibha M SinghSakal
Updated on

भारतीय स्त्रिया खूप भाग्यवान असतात कारण भारतीय संस्कृती आणि मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांनी स्त्रियांना मानाचं स्थान दिलं आहे, असं विधान दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका महिला न्यायाधीशाने केलं आहे. यावेळी त्यांनी मनुस्मृतीतले काही दाखलेही दिले आहेत. यामुळे आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Pratibha M Singh
खातेवाटप कधी होणार? CM शिंदेंनी स्पष्टच सांगितलं...

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग यांनी हे विधान केलं आहे. सिंग म्हणाल्या की, मला खरंच वाटतं की भारतातल्या महिला खूप भाग्यवान आहेत. त्याचं कारण म्हणजे आपल्या धर्मग्रंथांनी महिलांना मानाचं स्थान दिलं आहे. मनुस्मृतीमध्ये म्हटलं आहे की जर तुम्ही महिलांचा आदर सन्मान केला नाही, तर तुम्ही कितीही पूजापाठ करा, त्याला काहीही अर्थ राहणार नाही. त्यामुळे मला वाटतं की महिलांचा आदर कसा करावा हे आपल्या पूर्वजांना आणि वैदिक ग्रंथांना माहित आहे.

Pratibha M Singh
लघुशंकेला जाणं पडलं महागात; माहीम खाडीत दोन तरुण बुडाले!

सिंग पुढे म्हणाल्या की, आशियाई राष्ट्रांमध्ये महिलांना घरी, कामाच्या ठिकाणी, समाजामध्ये आणि एकूणातच खूप मानसन्मान दिला जातो. मला वाटतं याचं कारण म्हणजे आपल्या धर्मग्रंथांनी आपल्याला दिलेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक शिकवण. विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय आणि गणित या क्षेत्रांमधल्या महिलांच्या समस्या या विषयावर आयोजित एका परिषदेत प्रतिभा सिंग बोलत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com